Jump to content

सेल्टिक समुद्र

सेल्टिक समुद्र

सेल्टिक समुद्र (आयरिश: An Mhuir Cheilteach; वेल्श: Y Môr Celtaidd; कॉर्निश: An Mor Keltek; ब्रेतॉन: Ar Mor Keltiek; फ्रेंच: La mer Celtique) हा अटलांटिक महासागरामधील एक समुद्र आहे. हा समुद्र आयर्लंडच्या दक्षिणेस स्थित असून त्याच्या पूर्वेस इंग्लिश खाडी तर दक्षिणेस बिस्केचे आखात आहेत. युनायटेड किंग्डममधील वेल्स, कॉर्नवॉलडेव्हॉन तर फ्रान्समधील ब्रत्तान्य हे भूभाग सेल्टिक समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहेत.