सेलेस्टिया
मूळ लेखक | ख्रिस लॉरेल |
---|---|
प्रारंभिक आवृत्ती | २००१ |
सद्य आवृत्ती | विंडोज: १.६.१ (७ जून २०११) मॅक ओएस एक्स: १.६.१ (६ जून २०११) लिनक्स: १.५.१ (५ मे २००८) |
विकासाची स्थिती | सद्य |
संगणक प्रणाली | क्रॉस-प्लॅटफॉर्म |
संचिकेचे आकारमान | ३४.४ एमबी (विंडोज) ३८.७ एमबी (मॅक ओएस एक्स) २७.७ एमबी (लिनक्स) ५२.६ एमबी (स्रोत) |
सॉफ्टवेअरचा प्रकार | शैक्षणिक सॉफ्टवेर |
सॉफ्टवेअर परवाना | ग्नू जीपीएल |
संकेतस्थळ | शॅटर्स.नेट |
सेलेस्टिया ही एक त्रिमितीय खगोलशास्त्रीय संगणक आज्ञावली आहे. ही आज्ञावली हिप्पार्कस सूचीवर आधारित आहे व वापरकर्त्यास साऱ्या विश्वात फेरफटका मारण्याची मुभा देते. त्यामुळे आपण साऱ्या विश्वात आपण कोणत्याही दिशेने, कोणत्याही वेगाने व कोणत्याही वेळाच्या वेगात जाऊ शकतो. सेलेस्टिया ग्रहांचे, ताऱ्यांचे व दीर्घिकांचे त्रिमितीय दृश्य ओपनजीएलच्या सहाय्यने दाखवते.
नासा व इसा यांनी सेलेस्टियास त्यांच्या शैक्षणिक व आउटरीच प्रोग्राम्समध्ये वापरले आहे.
सेलेस्टिया मायक्रोसॉफ्ट विंडोज, लिनक्स, मॅक ओएस एक्स या संगणक प्रणाल्यांसाठी उपलब्ध आहे. ग्नू जनरल पब्लिक परवान्यावर प्रकाशित झालेले सेलेस्टिया हे एक मोफत सॉफ्टवेर आहे.
कार्य
सेलेस्टिया तब्बल १,२०,००० तारे असलेली हिप्पार्कस सूची दर्शवितो. तसेच तो ग्रहांच्या कक्षांसाठी व्हीएसओपी८७ ही अत्यंत अचूक पद्धत वापरतो.
सेलेस्टियाच्या वापरकर्त्यांना साऱ्या विश्वात साध्या कळफलकाच्या कीज वापरून कोणत्याही वेगात (०.००१ मी/सेकंद ते अनेक प्रकाशवर्ष/सेकंदांपर्यंत) भ्रमण करता येते. दृष्टीरेषा पुढे, मागे कुठेही सेट करता येते. वापरकर्त्यांना संचालने तारे, ग्रह, उपग्रह, धूमकेतू यांच्या भोवती कक्षेत भ्रमण करणे, त्यांचा पाठलाग करणे, तेजोमेघ व दीर्घिकांमधून जाणे इत्यादी सुविधा उपलब्ध करून देतात. (१०,००० च्या वर दीर्घिका उपलब्ध)
विस्तारके
कार्यरत सदस्य सभेने सेलेस्टिया प्रारंभिक प्रोग्रामसाठी १८ गीगाबाईटची विस्तारके उपलब्ध केली आहेत.
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2013-10-16 at the Wayback Machine.
- सेलेस्टिया अॅड-वन्सचे प्रमुख केंद्र