सेबास्तिआं बूर्दे
{{{चालक नाव}}} | |
---|---|
सेबास्तिआं बूर्दे (२८ फेब्रुवारी १९७९ - हयात) हा फ्रेंच रेस कार चालक आहे. तो चॅम्प कार रेसिंग स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी चालक आहे. त्याने ही स्पर्धा लागोपाठ चार वेळा (२००४-२००७) जिंकली आहे. २००८ मध्ये आणि २००९च्या सुरुवातीचा काही काळ त्याने फॉर्म्युला वनमध्ये स्कुदेरिआ टोरो रोस्सो या संघाचे प्रतिनिधित्व केले. परंतु चॅम्प कार रेसिंग स्पर्धेतील यशाची पुनरावृत्ती तो फॉर्म्युला वन मध्ये करण्यात अपयशी ठरला.