सेबास्टियन को
सेबास्टियन न्यूबोल्ड सेब को (२९ सप्टेंबर, १९५६:हॅमरस्मिथ, लंडन, इंग्लंड - ) हा ब्रिटिश धावपटू आणि राजकारणी आहे. याने १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत १९८० आणि १९८४ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदके मिळवली. याने अधिक दोन ऑलिंपिक पदकेही मिळवली आहेत.
क्रीडेतून निवृत्ती घेतल्यावर को युनायटेड किंग्डमचा खासदार झाला. याने १९९२ ते १९९७ दरम्यान फॉलमथचे प्रतिनिधित्व केले. १६ मे, २००० रोजी याला बॅरनपद बहाल केले गेले.
यानंतर त्याने लंडनमध्ये भरवल्या गेलेल्या २०१२ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांच्या यजमानपदाच्या शर्यतीसाठीच्या समितीचे अध्यक्षपद सांभाळले. त्याच वर्षी तो ब्रिटिश ऑलिंपिक समितीचा चेरमनसुद्धा झाला.