Jump to content

सेनापती कापशी

कापशी बाळीक्रे तथा सेनापती कापशी कागल तालुक्यातील गाव आहे.

इतिहास

गावाचा इतिहास तसा फार जुना आहे. मराठ्यांचा इतिहास रक्तरंजित आहे तसा पराक्रमी ही आहे. इतिहासात प्रत्येक मावळ्यांना आपल्या धन्यासाठी असणारी स्वामिनिष्ठ आणि स्वराज्याबद्दल असणारी आपुलकी ही कौतुकास्पद आहे.अखंड महाराष्ट्राचे दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून प्रेरित झालेल्या स्वराज्य संकल्पनेची गाथा आणि शिवरायांच्या मावळ्यांचे वैशिष्टय आहे. शिवरायांच्या शब्दाखातर प्रसंगी जीव धोक्यात घालून अनेक मोहीम फत्ते करणारे मावळे त्यांना असणारी स्वराज्याबद्दल असणारी तळमळ आणि धन्याचा शब्द कधीही न मोडणारे निष्ठावंत मावळे होते. शिवरायांच्या साम्राज्य विस्तारात कोल्हापूर प्रांताची अतुल्य अशी कामगिरी आहे.शिवाजी महाराजांच्या प्रत्येक लढाईत प्रत्येक मावळयाचे योगदान आहे.महाराजांच्या प्रत्येक लढाईत गनिमी काव्याचा वापर केलेला आहे,आणि त्याच बळावर जिंकलेल्या लढाया.शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्यात प्रत्येकाने अमूल्य कामगिरी केली आहे.शिवरायांच्या मृत्यूनंतर जेव्हा स्वराज्याची जबाबदारी छत्रपती संभाजी महाराजांच्या खांद्यावर पडली तेंव्हा त्यांनी ती समर्थपणे पेलली. जेंव्हा स्वराज्याचे खंबीर खांब असणारे हंबीरराव मोहिते हे युद्धात धारातीर्थी पडले त्यानंतर शंभू राजेनी स्वराज्याच्या सरसेनापती पदाची जबाबदारी म्हाळोजी घोरपडेंच्या दिली.म्हाळोजी घोरपडे हे कोल्हापूर प्रांतातील कागल तालुक्यातील कापशी या गावाचे होते. शंभू राजे जेव्हा फितुरी मुळे सापडले गेले तेंव्हा त्यांना वाचवण्यासाठी म्हाळोजी घोरपडे हे धारातीर्थी पडले. शंभूराजेंना वाचवण्यासाठी आपला जीव गमावला. शंभू राजे आणि म्हाळोजी घोरपडेंच्या मृत्यूनंतर राजाराम राजे छत्रपती झाले त्यांनी संताजी घोरपडे यांना सरसेनापतीचा किताब दिला. संताजी घोरपडे हे छत्रपती संभाजी महाराजांच्या आणि म्हाळोजी घोरपडे यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्यांनी थेट औरंगजेबाच्या छावणीत छापा मारला आणि त्याच्या तंबूचा सोन्याचा कळस कापून आणला होता.नशीब बलवत्तर म्हणून औरंगजेब बादशहा आपल्या मुलगीच्या म्हणजे झीनतच्या तंबूत होता,नाहीतर त्याचे शीर धडावेगळे झाले असते. संताजी घोरपडे हे म्हाळोजी घोरपडे यांचे सुपुत्र होते. त्यांनी औरंगजेबाच्या स्वराज्य काबीज करण्याच्या महत्त्वाकांक्षेला खीळ घालत होते. त्यांनी औरंगजेबाच्या सैन्याला खूप बेजार करून सोडले होते. त्यांनी दिल्लीवरून घोडा अवघ्या चार प्रहरात आणला होता.त्यांच्या या कर्तुत्वाला जागुनच गावाचे नाव सेनापती कापशी असे पडले. आजही गावात सरसेनापती संताजी घोरपडे यांचे वंशज आहेत. गावातल्या यात्रेच्या पालखीचा मान प्रथम घोरपडे घराण्याला आहे.

स्थान

विकिमॅपिया