Jump to content

सेझार पुरस्कार

सेझार पुरस्कार (फ्रेंच: César du cinéma) हे चित्रपट क्षेत्रासाठीचे फ्रान्सातील राष्ट्रीय पुरस्कार आहेत. १९७५ सालापासून सुरू झालेले हे पुरस्कार दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात जाहीर करण्यात येतात. 'आकादेमी दे आऱ्ह ए टेश्निक दु सिनेमा' या अकादमीच्या सदस्यांमार्फत पुरस्कारांसाठी नामांकने निवडली जातात.

शिल्पकार सेझार बाल्दाच्चीनी याच्या नावावरून या पुरस्कारांना सेझार पुरस्कार असे नाव देण्यात आले. पुरस्कारासाठी दिल्या जाणाऱ्या ट्रॉफ्या बाल्दाच्चीनीने बनवलेली शिल्पांवरून बनवल्या आहेत.