Jump to content

सेक्टर १६ स्टेडियम

सेक्टर १६ स्टेडियम
मैदान माहिती
स्थानचंदिगढ
स्थापना १९६६
आसनक्षमता ३०,०००[]
मालक चंदिगढ क्रिकेट असोसिएशन
प्रचालक चंदिगढ जिल्हा क्रिकेट असोसिएशन
यजमानसीसीएल पंजाब दे शेर [][]
पंजाब क्रिकेट संघ
हरयाणा क्रिकेट संघ

आंतरराष्ट्रीय माहिती
एकमेव क.सा.२३-२७ नोव्हेंबर १९९०:
 वि. 
प्रथम ए.सा.२७ जानेवारी १९८५:
भारत वि. इंग्लंड
अंतिम ए.सा.८ ऑक्टोबर २००७:
भारत वि. ऑस्ट्रेलिया
शेवटचा बदल ६ जानेवारी २०१७
स्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

सेक्टर १६ मैदान (पंजाबी: ਸੇਕ੍ਟਰ ੧੬ ਸਟੇਡਿਯਮ) हे भारतातील चंदिगढ स्थित एक क्रिकेट मैदान आहे.

ह्या मैदानावर पहिला एकदिवसीय सामना जानेवारी १९८५ मध्ये आणि एकमेव कसोटी सामना १९९० साली खेळवला गेला.

कपिल देव, चेतन शर्मा आणि युवराज सिंग ह्यासारख्या दिग्गज खेळाडूंनी त्यांच्या क्रिकेटची सुरुवात सेक्टर १६ स्टेडियमवरून केली. जवळच्या पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदानामुळे ह्या मैदानाचे महत्त्व कमी झाले.

मोहालीमध्ये नवे मैदान तयार झाल्यानंतर पुढची १० वर्षे सेक्टर १६ स्टेडियमवर एकही प्रथम श्रेणी सामना खेळवण्यात आला नाही, त्यानंतर २००४/०५ च्या रणजी मोसमातील उपांत्य सामना येथे खेळवण्यात आला. ऑक्टोबर २००७ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान येथे एकदिवसीय सामना खेळवण्यात आला.

नोंदी

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट

फलंदाजी

  • सर्वाधिक धावा - नवज्योतसिंग सिद्धू (भारत) – २ सामन्यांमध्ये १८० धावा
  • एका डावात सर्वाधिक धावा – जेफ मार्श (ऑस्ट्रेलिया) – १२६*

गोलंदाजी

  • सर्वाधिक बळी - कपिल देव (भारत) – ३ सामन्यांमध्ये ४ बळी
  • एका डावात सर्वोत्तम गोलंदाजी – तिरुमलाई शेखर (भारत) – ३/२३

कसोटी क्रिकेट

फलंदाजी

गोलंदाजी

आंतरराष्ट्रीय सामन्यांची यादी

कसोटी

आजवर मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[]:

दिनांकसंघ १संघ २विजयी संघफरकधावफलक
२३-२७ नोव्हेंबर १९९०भारतचा ध्वज भारतश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाभारतचा ध्वज भारत१ डाव आणि ८ धावाधावफलक

एकदिवसीय

आजवर मैदानावर झालेल्या एकदिवसीय सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[]:

दिनांकसंघ १संघ २विजयी संघफरकधावफलक
२७ जानेवारी १९८५भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंडचा ध्वज इंग्लंड७ धावाधावफलक
२७ ऑक्टोबर १९८७ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियान्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया१७ धावाधावफलक
२५ डिसेंबर १९९०भारतचा ध्वज भारतबांगलादेशचा ध्वज बांगलादेशभारतचा ध्वज भारत९ गडीधावफलक
२१ जानेवारी १९९३भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारतचा ध्वज भारत५ गडीधावफलक
८ ऑक्टोबर २००७भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाभारतचा ध्वज भारत८ धावाधावफलक

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ http://www.discoveredindia.com/chandigarh/sports-tourism-in-chandigarh.htm
  2. ^ "सीसीएलचा पहिला सामना सेक्टर १६ स्टेडियमवर". संडे गार्डियन (इंग्रजी भाषेत). 2017-08-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ६ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  3. ^ "पंजाब दे शेर आणि मुंबई हिरोज, २८ मार्च २०१५, क्रिकेट स्टेडियम, सेक्टर १६, चंदिगढ". अपना बॉलिवूड.कॉम. 2015-03-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ६ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  4. ^ "सेक्टर १६ स्टेडियम, चंदिगढ / नोंदी / कसोटी सामने / सामने निकाल" (इंग्रजी भाषेत). ५ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  5. ^ "सेक्टर १६ स्टेडियम, चंदिगढ/ नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने / सामने निकाल" (इंग्रजी भाषेत). ५ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.