सेंत-देनिस
सेंत-देनिस Saint-Denis | |
फ्रान्समधील शहर | |
![]() | |
![]() | |
देश | ![]() |
प्रदेश | इल-दा-फ्रान्स |
विभाग | सीन-सेंत-देनिस |
क्षेत्रफळ | १२.३६ चौ. किमी (४.७७ चौ. मैल) |
लोकसंख्या (२००९) | |
- शहर | १,०५,७४९ |
- घनता | ८,५५६ /चौ. किमी (२२,१६० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ |
सेंत-देनिस (फ्रेंच: Saint-Denis) हे फ्रान्स देशाच्या पॅरिस महानगरामधील एक शहर आहे. हे शहर पॅरिसच्या ९.४ किमी उत्तरेस इल-दा-फ्रान्स प्रदेशाच्या सीन-सेंत-देनिस विभागात वसले आहे.
१.०५ लाख लोकसंख्या असलेले सेंत-देनिस येथील स्ताद दा फ्रान्स ह्या स्टेडियमसाठी प्रसिद्ध आहे. १९९८ फिफा विश्वचषकासाठी बांधल्या गेलेल्या ह्या स्टेडियममध्ये अंतिम सामना खेळवण्यात आला होता. सध्या फ्रान्स फुटबॉल संघ आपले यजमान सामने येथूनच खेळतो.
वाहतूक
सेंत-देनिस पॅरिस मेट्रोच्या चार मार्गांनी पॅरिस व इतर उपनगरांसोबत जोडले गेले आहे.
जुळी शहरे
कोर्दोबा
गेरा
कोटब्रिज
पोर्तू अलेग्री
मिलान
तुस्ला
नाझारेथ