Jump to content

सेंट लॉरेन्स मैदान

सेंट लॉरेन्स मैदान
मैदान माहिती
स्थानकेंट, इंग्लंड
स्थापना १८४७
आसनक्षमता ७,०००
मालक केंट काउंटी क्रिकेट क्लब

प्रथम ए.सा.१८ मे १९९९:
इंग्लंड Flag of इंग्लंड वि. केन्याचा ध्वज केन्या
अंतिम ए.सा.३० जून २००५:
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
यजमान संघ माहिती
केंट काउंटी क्रिकेट क्लब (१८४७-सद्य)
शेवटचा बदल १६ फेब्रुवारी २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

सेंट लॉरेन्स मैदान हे इंग्लंडच्या केंट शहरातील कॅंटरबरी भागातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. केंट काउंटी क्रिकेट क्लब या मैदानाचा घरचे मैदान म्हणून वापर करतात.

१ ऑगस्ट १९७६ रोजी इंग्लंड महिला आणि ऑस्ट्रेलिया महिला संघामध्ये या स्टेडियमवर पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला. १६ जुलै १९७९ रोजी इंग्लंड महिला आणि वेस्ट इंडीज महिला या दोन संघांनी या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना खेळला. २६ जून २०१२ रोजी इंग्लंड महिला आणि भारत महिला या संघांमध्ये येथे पहिला महिला ट्वेंटी२० सामना झाला.

पुरूषांच्या क्रिकेट मध्ये १९९९ क्रिकेट विश्वचषकात १८ मे १९९९ रोजी इंग्लंड आणि केन्या या दोन देशांमध्ये या मैदानावर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.