Jump to content

सृष्टी देशमुख

सृष्टी देशमुख गौडा ( २८ मार्च १९९६) या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत.[] २०१८ मध्ये संघ लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्या चर्चेत आल्या. या परीक्षेत त्यांनी भारतात ५ वा क्रमांक पटकावला होता.[] तसेच मुलींमध्ये त्यांचा देशात प्रथम क्रमांक आला होता.[][][]एप्रिल 2022 मध्ये, तिने I.A.S अधिकारी अर्जुन गौडासोबत लग्न केले.

जीवन

सृष्टी देशमुख यांचा जन्म मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आहे. त्या मूळच्या मराठी आहेत.[] त्यांच्या आई सुनीता देशमुख या शिक्षिका तर वडील जयंत देशमुख हे अभियंते आहेत.[] त्यांना एक लहान भाऊ आहे.[]

देशमुख यांनी भोपाळच्या कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल येथे बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. १२ वी बोर्डाच्या परीक्षेत ९३.४ टक्के मिळवून त्या गुणवत्ता यादीत आल्या होत्या. नंतर त्यांनी भोपाळच्या लक्ष्मी नारायण कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजीमधून रासायनिक अभियांत्रिकी (२०१४ ते २०१८) मध्ये बी.टेक.ची पदवी घेतली.[]

कारकीर्द

रासायनिक अभियांत्रिकीमधील पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर भोपाळमध्येच त्यांनी संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी देशात मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तसेच गुणवत्ता यादीत त्या ५ व्या क्रमांकावर होत्या.[][]

त्या २०१९ बॅचच्या आय.ए.एस अधिकारीआहेत. त्यांची पहिली नियुक्ती मध्य प्रदेशातील दिंडोरी येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली होती. सध्या देशमुख यांची मध्य प्रदेशातील नरसिंगपूर जिल्ह्यातील गादरवारा येथील उपविभागीय अधिकारी या पदावर कार्यरत आहेत.[][][१०]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ a b "Srushti Deshmukh Engagement : शादी से पहले जानें पूरी लव स्टोरी, IAS नागार्जुन गौड़ा ने ऐसे जीता दिल? | IAS officer Srushti Jayant Deshmukh and Dr Nagarjuna B Gowda got engaged, Love story started in LBSNAA - Hindi Oneindia". hindi.oneindia.com (हिंदी भाषेत). 2021-08-05. 2022-03-03 रोजी पाहिले.
  2. ^ टीम, एबीपी माझा वेब. "यूपीएससी परीक्षेत देशात महिलांमध्ये अव्वल मराठमोळ्या सृष्टी देशमुखचा कानमंत्र". ABP Marathi. 2022-03-03 रोजी पाहिले.
  3. ^ "'मी स्वत:वर विश्वास ठेवला': UPSC गर्ल्स टॉपर सृष्टी देशमुखच्या यशाचं रहस्य". BBC News मराठी. 2019-04-06. 2022-03-03 रोजी पाहिले.
  4. ^ Live, A. B. P. "सिविल सेवा की तैयारी के वक्त नेगेटिव लोगों को करें इग्नोर, जानें सृष्टि जयंत देशमुख से टिप्स". ABP News (हिंदी भाषेत). 2022-03-03 रोजी पाहिले.
  5. ^ a b "UPSC Topper सृष्टी देशमुख सांगतेय, तिच्या यशाचं रहस्य". News18 Lokmat. 2019-04-05. 2022-03-03 रोजी पाहिले.
  6. ^ "Meet Srushti Deshmukh, who secured AIR 5 in UPSC exams in her first attempt, prepared for IAS by watching TV". www.dnaindia.com. 2022-03-03 रोजी पाहिले.
  7. ^ a b c "UPSC Success Story : वयाच्या 23व्या वर्षी 'यूपीएससी'त यश मिळवणारी सृष्टी!". eSakal - Marathi Newspaper. 2022-03-03 रोजी पाहिले.
  8. ^ "इस चैनल को बनाया नॉलेज पाने का जरिया, पहले ही प्रयास में बनीं IAS ऑफिसर". Amar Ujala (हिंदी भाषेत). 2022-03-03 रोजी पाहिले.
  9. ^ "सृष्टि जयंत देशमुख ने यूपीएससी के पहले अटेम्प्ट में हासिल की 5वी रैंक, प‌ढ़ें इनकी कहानी". Jansatta (हिंदी भाषेत). 2022-03-03 रोजी पाहिले.
  10. ^ "IAS SUccess story: सृष्टि ने यूपीएससी की तैयारी के लिए अपनाया ये तरीका, पहले ही प्रयास में बनीं IAS". News18 हिंदी (हिंदी भाषेत). 2020-05-14. 2022-03-03 रोजी पाहिले.