Jump to content

सूर्यनगरी एक्सप्रेस

सूर्यनगरी एक्सप्रेसचा फलक
मार्गाचा नकाशा

सूर्यनगरी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. ही गाडी मुंबईच्या वांद्रे टर्मिनस ते जोधपूर स्थानकांदरम्यान रोज धावते. पश्चिम रेल्वेमार्गे धावणाऱ्या सूर्यनगरी एक्सप्रेसला मुंबई ते जोधपूर दरम्यानचे ९३५ किमी अंतर पार करायला १७ तास लागतात.

वेळापत्रक

गाडी क्रमांक मार्ग प्रस्थान आगमन कधी
१२४८०मुंबई वांद्रे टर्मिनस – जोधपूर१३:३००६:३०रोज
१२४७९जोधपूर – वांद्रे टर्मिनस१८:४५११:३५रोज

रचना

१२४७९/१२४८० क्रमांक असलेल्या या गाडीला सहसा एक वातानुकुलित २ टियर, एक वातानुकुलुत पहिला आणि २ टियर, चार वातानुकुलित ३ टियर, १२ शयनयान आणि पाच अनारक्षित डबे जोडलेले असतात.

बाह्य दुवे