Jump to content

सूर्यकांत मांढरे

सूर्यकांत मांढरे
जन्मसूर्यकांत मांढरे
मृत्यू २२ ऑगस्ट, १९९९
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषामराठी

सूर्यकांत ( - २२ ऑगस्ट, इ.स. १९९९) या नावाने मराठी चित्रपटांत नायकाची भूमिका करणारे सूर्यकांत मांढरे हे एक मराठी नाट्य-चित्रअभिनेते आणि चित्रकार होते. सूर्यकांत आणि त्यांचे भाऊ चंद्रकांत हे अनेक ऐतिहासिक आणि सामाजिक मराठी चित्रपटांत एकत्रपणे झळकले आहेत.

सूर्यकांत यांची भूमिका असलेले मराठी चित्रपट

  • अखेर जमलं
  • अंतरिचा दिवा
  • आयुष्यवंत हो बाळा
  • कन्यादान
  • कलंकशोभा
  • कांचनगंगा
  • कुलदैवत
  • केतकीच्या बनात
  • गरिबाघरची लेक
  • गाठ पडली ठका ठका
  • गृहदेवता
  • संत चांगदेव
  • जगावेगळी गोष्ट
  • जय भवानी
  • तोचि साधू ओळखावा
  • थोरातांची कमळा
  • थोरातांची मंजुळा
  • धन्य ते संताजी धनाजी
  • ध्रुव
  • संत निवृत्ती-ज्ञानदेव
  • पंचारती
  • पतिव्रता
  • प्रीतिसंगम
  • फकिरा
  • भाऊबीज
  • भाव तेथे देव
  • मल्हारी मार्तंड
  • महाराणी येसूबाई
  • मुकी लेकरे
  • मोहित्यांची मंजुळा
  • रंगपंचमी
  • रानपाखरं
  • शिलंगणाचे सोने
  • शुभमंगल
  • सलामी
  • सांगत्ये ऐका
  • सांगू कशीमी
  • सासर माहेर
  • सासुरवास
  • स्वराज्याचा शिलेदार
  • ही नार रूपसुंदरी

सूर्यकांतांची भूमिका असलेली मराठी नाटके

  • अठरावं वरीस लग्नाचं
  • आकाशाची उंची ठेंगणी
  • आग्ऱ्याहून सुटका
  • आज इथं तर उद्या
  • इश्काची इंगळी डसली
  • उसाला लागंल कोल्हा
  • एक होता एक
  • कथा कुणाची आणि व्यथा कुणाला
  • गळाला लागला मासा
  • गेला सोडुन माझा कान्हा
  • जाळिमंदी पिकली करवंदं
  • जीवन माझे गंगाजल
  • झुंझारराव
  • तुझे आहे तुजपाशी
  • तुम्हावर केली मी मर्जी बहाल
  • तुम्हावरि जिव माझा जडला
  • तुम्हि हो माझे बाजिराव
  • दसरा उजाडला
  • दिल्या घरी तू सुखी रहा
  • निळावंती
  • पाटलाच्या पोरी जरा जपून
  • पाठलाग
  • पाव्हणा आला रे आला
  • बायको बिलंदर नवरा कलंदर
  • बेबंदशाही
  • माझा कुणा म्हणू मी
  • रात रंगली पुनवेची
  • लग्नाची बेडी
  • लाखात हेरला धनी
  • वादळवेल
  • विलासपूरची रंभा
  • शांतिसंग्राम
  • सह्याद्रीचं सोनं
  • सोळावं वरीस धोक्याचं
  • ही खंत जाळिते मना

सन्मान आणि पुरस्कार

  • सूर्यकांत मांढरे यांच्या नावाचे एक कलादालन पुण्यातील सहकारनगर येथील भीमसेन जोशी कलादालनाचा एक भाग होते. सूर्यकांत यांच्या चित्र कलाकृती, तसेच त्यांना राज्य सरकार व विविध संस्थांकडून मिळालेले पुरस्कार जतन करून ठेवण्यासाथी ज्या वस्तू मांढरे कुटुंबीयांनी पुणे महापालिकेच्या स्वाधीन केल्या होत्या, त्या या कलादालनात ठेवल्या आहेत. त्यांची नीट देखभाल होत नसल्याचे आढळल्याने या वस्तू आता सूर्यकांत माढरे यांच्या नावाच्या एका स्वतंत्र कलादालनात स्थानांतरित करण्यात येणार आहेत. (२३-२-२०१६ची बातमी). हे नवीन कलादालन पुण्यातील पद्मावती येथील अण्णा भाऊ साठे स्मारकाच्या आवारात उभारण्यात येणार आहे.