सूक्ष्मजीव
आकाराने सूक्ष्म असणाऱ्या सजीवांना सूक्ष्मजीव (इंग्लिश: Microorganism, मायक्रोऑरगॅनिझम) असे म्हणतात. सूक्ष्मजीवांचा अभ्यास करणाऱ्या विद्याशाखेस सूक्ष्मजीवशास्त्र असे म्हणतात.
रोगकारक सूक्ष्मजीव
सूक्ष्मजीवांपैकी अनेक जाती रोगांसाठी कारणीभूत असतात. उदाहरणार्थ क्षय रोगासाठी मायक्रोबॅक्टेरिम ट्यूबरकुलाॅसिस हा जंतू कारणीभूत आहे. जंतूंना जीवाणू असेदेखील म्हणले जाते
जंतुसंसर्ग
जंतुसंसर्ग झाल्याने रोगप्रतिकारशक्ती कमी होते. भाजलेल्या जखमांना जंतुसंसर्गाचा खूप मोठा धोका असतो. कुपोषणामुळे क्षयरोगासारखा जंतुसंसर्ग होतो.
निदान
लघवी, रक्त, थुंकी, विष्ठा यांच्या तपासण्यांद्वारे जंतुसंसर्गाचे निदान होऊ शकते. लाळेच्या तपासणीमधूनही निदानाची पद्धती अवलंबली जाते.