Jump to content

सुहासिनी देशपांडे (लेखिका)

सुहासिनी देशपांडे ह्या भारतीय इतिहास-अभ्यासक आणि लेखिका आहेत.

जन्म - २६ जानेवारी १९५२

शिक्षण व कारकीर्द

ग्रंथसंपदा

कथालेखन

कुमारवयीन मुलांसाठी कथालेखन आजवर सहा कथासंग्रह प्रकाशित.

०१) किमयागार- प्रथम आवृत्ती डिसेंबर २०२१ []

०२) कंगोरे - महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सहाय्याने प्रकाशित.

०३) मृदूभाव जागे होता - छात्र प्रबोधन द्वारा प्रकाशित.[]

०४) इंद्रधनू आणि इतर कथा - नंदिनी पब्लिशिंग हाऊस, पुणे तर्फे प्रकाशित

०५) व्हेन गुडनेस प्रिव्हेल्स - ‘इंद्रधनू आणि इतर कथा’चा इंग्रजी अनुवाद, छात्र प्रबोधन पुणे द्वारा प्रकाशित.

०५) कागदी महाल आणि इतर कथा - नंदिनी पब्लिशिंग हाऊस, पुणे.[]

काव्यसंग्रह

देठापाशी लव सोनेरी

कादंबरी

  • कहाणी दोन भावांची, छात्र प्रबोधन पुणे द्वारा प्रकाशित. 'वेटिंग फॉर मिराकल्स' या वॉल्ट डिस्नेच्या चित्रपटकथेचा प्रा. सुहासिनी देशपांडे यांनी केलेला हा स्वैर भावानुवाद आहे.[] या कुमार कादंबरिकेसाठी लेखिकेस बाल-कुमार साहित्य मंडळाचा “इंदिरा जोशी” पुरस्कार प्राप्त झाला आहे. आजवर या पुस्तकाच्या तीन आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत.
  • सुदीप नगरकर लिखित 'फ्यू थिंग्ज लेफ्ट अनसेड'[] या कादंबरीचा मराठी अनुवाद, प्रकाशन २०१२, ISBN - 978-93-80131-53-5 ही सत्यकथेवर आधारित कादंबरी आहे.

इतिहासपर ग्रंथ

  • संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहिरांचे योगदान, परिवर्तन प्रकाशन, पुणे.
  • जहांआरा बेगम कहाणी मुघल शहजादीची - जहानआराची कहाणी आन्द्रिया वुतेनशोएन या पाश्चात्य लेखिकेने कादंबरीरूपात लिहिली आहे. तिचे ’जहानआरा बेगम - कहाणी मुघल शाहजादीची’ या नावाचे मराठी रूपांतर प्रकाशित करण्यात आले आहे.
  • पदरव भारतीय इतिहासाचे - (फूटफॉल्स ऑफ इंडियन हिस्टरी - मूळ लेखिका भगिनी निवेदिता ), रामकृष्ण मठ, नागपूर यांच्यातर्फे प्रकाशित.
  • भारताचा राष्ट्रीय धर्म – भगिनी निवेदितांच्या लेखसंग्रहाचे मराठी रूपांतर, रामकृष्ण मठाच्या 'जीवन विकास' या नियतकालिकामधून क्रमशः प्रकाशित होत आहे.
  • आर्यांचे आक्रमण - अगा जे घडलेचि नाही (मायकेल डॅनिनो - द इन्व्हेजन दॅट नेव्हर वॉज), विवेकांनद केंद्र, मराठी प्रकाशन विभाग, पुणे तर्फे प्रकाशित.
  • श्रीअरविंद आणि महाराष्ट्र [] श्रीअरविंद यांचा महाराष्ट्राशी असलेला अनुबंध यामधून स्पष्ट होतो.

आत्मवृत्तांची शब्दांकने

  • अ-जून राम आहे - श्री. राम घोडके यांच्या आफ्रिकेतील अनुभवांचे कथन. उत्कर्ष प्रकाशन, पुणे.
  • गवसले सूर जीवनाचे - कोकणातील सामान्य घरातून आलेल्या आणि यशस्वी उद्योगपती बनलेल्या लायन (कै.) मदनभाई सुरा यांचे आत्मकथन. उत्कर्ष प्रकाशन, पुणे.
  • कोकणातील मुसाफिर, जगाच्या पाठीवर - लायन (कै.) मदनभाई सुरा यांच्या प्रवास वर्णनाचे शब्दांकन. उत्कर्ष प्रकाशन, पुणे.
  • जरा विसावू या वळणावर - डॉ. मनीषा ब्रह्मे यांच्या आत्मकथनाचे शब्दांकन.

अन्य

१९८३ चा धुमसणारा पंजाब प्रश्न, १९८७ मध्ये चिघळलेला गुरखा आंदोलन प्रश्न यासारख्या प्रश्नांवर अभ्यास दौरे करून भिंद्रनवाले, लोंगोवाल, गुरूचरणसिंग तोहरा, प्रकाशसिंग बादल, त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी, सुभाष घिशिंग, डी.आय.जी. हांडा अशा अनेक मान्यवर व्यक्ती तसेच सर्वसामान्य व्यक्तींच्या मुलाखती घेऊन त्यावर लेखमाला, व्याख्याने दिली आहेत.

पुरस्कार

  • कुमारवयीन मुलांसाठी केलेल्या कथालेखनाला संगमनेर इतिहास संशोधन मंडळाचा 'कवी अनंतफंदी पुरस्कार'
  • कहाणी दोन भावांची, या कुमार कादंबरिकेसाठी बाल-कुमार साहित्य मंडळाचा 'इंदिरा जोशी' पुरस्कार
  • 'देठापाशी लव सोनेरी' या काव्यसंग्रहास साहित्य गौरव पुरस्कार.
  • 'किमयागार' (कुमार - कथासंग्रह) २०२१ साली महाराष्ट्र राज्य शासनाचा ‘राजा मंगळवेढेकर पुरस्कार'
  • इंद्रधनू आणि इतर कथा - नंदिनी पब्लिशिंग हाऊस, पुणे तर्फे प्रकाशित या कथासंग्रहास पुढील पुरस्कार प्राप्त झाले आहेत. संगमनेर इतिहास संशोधन मंडळ संगमनेर तर्फे 'कवी अनंत फंदी' साहित्य पुरस्कार, साहित्य प्रेमी भगिनी मंडळ तर्फे 'कै.इंदिरा गोविंद' पुरस्कार, अक्षरमंच प्रतिष्ठान, कल्याण यांच्यातर्फे 'अक्षरगंध पुरस्कार'.
  • आर्यांचे आक्रमण - अगा जे घडलेचि नाही - महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेतर्फे भारत भाषा भूषण श्री.ना.चाफेकर पुरस्कार - (२९ ऑक्टोबर २०२३)

संदर्भ

  1. ^ "ज्ञानप्रबोधिनी प्रकाशने". www.jpprakashane.org. १५ एप्रिल २०२३.
  2. ^ "akshardhara.com". akshardhara.com. 2023-04-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-04-14 रोजी पाहिले.
  3. ^ "कुमार गटासाठी नव्या पुस्तकांचा ठेवा". www.esakal.com. १५ एप्रिल २०२३.
  4. ^ "कहाणी दोन भावांची". www.amazon.in. १५ एप्रिल २०२३.
  5. ^ ले.सुदीप नगरकर, अनुवाद - सुहासिनी देशपांडे (२०१२). फ्यू थिंग्ज लेफ्ट अनसेड. पुणे: नंदिनी पब्लिशिंग हाउस. ISBN 978-93-80131-53-5.
  6. ^ सुहासिनी देशपांडे (२०२३). श्रीअरविंद आणि महाराष्ट्र. पुणे: श्रीअरविंद सोसायटी, मुंबई शाखा.