सुहानी शाह
सुहानी शहा | |
---|---|
जन्म | २९ जानेवारी, १९९० उदयपूर, राजस्थान |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
टोपणनावे | जादूपरी |
पेशा | मानसिकतावादी, जादूगार, संमोहन उपचार तज्ज्ञ |
कारकिर्दीचा काळ | १९९७ - ते आजतागायत |
धर्म | हिंदू |
संकेतस्थळ https://www.suhanishah.com |
सुहानी शहा (जन्म:२९ जानेवारी, १९९०)[१] एक भारतीय मानसिकतावादी, जादूगार आणि यूट्यूबर आहे.
प्रारंभिक जीवन
सुहानी शाहचा जन्म २९ जानेवारी १९९० रोजी उदयपूर,[१] येथे एका मारवाडी कुटुंबात झाला.[२][३] तिची आवड जोपासण्यासाठी तिने इयत्ता २री मध्ये तिने शाळेत जाणे सोडले. तिच्या सततच्या जगभरातील दौऱ्यांमुळे तिने घरीच पुढील शिक्षण घेतले. सुहानीचे औपचारिक शिक्षण कधीच झाले नव्हते आणि यावर तिचे म्हणण आहे की "शाळा जे शिकवू शकते त्यापेक्षा अनुभवांनी जास्त शिकवले".[४]
कारकीर्द
तिचा पहिला स्टेज शो २२ ऑक्टोबर १९९७ रोजी अहमदाबादच्या ठाकोरभाई देसाई हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. तिने आतापर्यंत अनेक पुरस्कार जिंकले आहेत आणि तिला ऑल इंडिया मॅजिक असोसिएशनद्वारेजादूपरी ही पदवी बहाल करण्यात आली आहे.[५] २०१९ पर्यंत तिने ५,००० हून अधिक शो केले आहेत. [६] तिने एक भ्रमवादी म्हणून सुरुवात केली आणि आता ती मानसिकतावादी आहे.[७] ती गोव्यातील सुहानी माइंडकेअर च्या क्लिनिकमध्ये क्लिनिकल हिप्नोथेरपिस्ट (संमोहन तज्ज्ञ) म्हणून काम करते.[८] ती कॉर्पोरेट ट्रेनर, लेखिका आणि समुपदेशक आहे आणि तिने अनेक TED टॉक्स (चित्रफीत द्वारे मुद्रित कार्यक्रम) दिले आहेत.[९]
प्रकाशने
- Shah, Suhani (2006). Unleash Your Hidden Powers. Jaico Publishing House. ISBN 8179926702.
यूट्यूब
ती यूट्यूब वर नियमित सक्रिय असते, जिथे ती भ्रम आणि मानसिकता यासारख्या विषयांवर व्हिडिओ अपलोड करते. तिचा दॅट्स माय जॉब नावाचा वेब शो देखील आहे.
हे सुद्धा पहा
संदर्भ
- ^ a b Kumar, Aman (27 January 2023). "Suhani Shah: 'दिमाग पढ़ने' वाली लड़की... क्लास 1 तक ही गई स्कूल, अनोखी है सुहानी की कहानी" [Suhani Shah: A 'mind reading' girl... only went to school untill class 1, Suhani's story is unique]. Aaj Tak.
- ^ Kashyap, Kajal (19 August 2017). "Bilaspur: In A Moment The Girl Is Missing This Beautiful Sorceress". Patrika News (hindi भाषेत). 22 July 2021 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 22 July 2021 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ Mukherjee, Kakoli (26 February 2020). "These mind readers in Hyderabad will leave you in awe". The New Indian Express. 22 July 2021 रोजी पाहिले.
- ^ Nagarajan, Uthra (17 August 2014). "Casting a spell". The Hindu (इंग्रजी भाषेत). 26 July 2021 रोजी पाहिले.
- ^ Pattanashetti, Girish (23 July 2005). "Magical musings of a teenager". The Hindu (इंग्रजी भाषेत). 26 July 2021 रोजी पाहिले.
- ^ Hussain, Tabir (25 February 2019). "क्लास वन के बाद स्कूल नहीं गई ये मैजिक गर्ल, अब पढ़ रहीं लोगों का दिमाग". Patrika News (hindi भाषेत). 22 July 2021 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ Nair, Likhita (21 November 2019). "Works Like Magic". The New Indian Express. 22 July 2021 रोजी पाहिले.
- ^ Menon, Shruti (26 November 2012). "Who is Suhani Shah?". Deccan Chronicle (इंग्रजी भाषेत). 27 July 2021 रोजी पाहिले.
- ^ Bhatt, Priyanka (8 March 2018). "Meet Suhani Shah, The Only Female Magician In India Who Rules The Male Dominant Profession!". IndiaTimes (इंग्रजी भाषेत). 22 July 2021 रोजी पाहिले.