Jump to content

सुस्ते (पंढरपूर)

सुस्ते हे गाव पंढरपूर-सोलापूर रोड वरती आहे. सुस्ते गावात एक प्राथमिक शाळा आहे. सुस्ते गावात एक मारुतीचे मंदिर आहे. गावात दवाखाना आहे (सालविठठल). सुस्ते गावाचा थोड बाहेर श्री दत्त विद्या मंदिर सुस्ते ही शाळा आहे (5 वी ते 12 वी). श्री दत्त विद्या मंदिर ही पंढरपूर येथील विवेक वर्धनीची शाखा आहे. गावाचा आठवड्यातून एकदा रविवारी बाजार भरतो. या बाजारांत सगळया पालेभाज्या मिळतात. या गावात बँक ऑफ महाराष्ट्र आहे (शाखा सुस्ते). या गावात देवी अंबाबाईचे मंदिर आहे. या गावामध्ये भोसले पाटील, चव्हाण, घाडगे अशी काही आडनाव असलेले तसेच अजून काही लोक राहतात.

संपर्क व दळणवळण-गावात पोस्ट व तार ऑफिस आहे. गावाचा पिन-कोड ४१३३०४ आहे. गावात मोबाईल फोन सुविधा, इंटरनेट सुविधा आहेत गावात शासकीय बस सेवा आहे. तसेच गावात टमटम ऑटोरिक्षा उपलब्ध आहेत. गावात जेसीबी उपलब्ध आहेत.

स्वच्छता-

गावात बंद गटारे आहेत.

पिण्याचे पाणी-गावात पाण्याची टाकी आहे. पाण्याची टाकी पारावरती आहे. या टाकतील पाण्याचा घरोघरी वापर केला जातो. दिवसातून दोन वेळा नळाला पाणी सोडले जाते.

उत्पाद्न- सुस्ते येथील लोक शेतामध्ये जास्त प्रमानावर ऊसं लावतात. तसेंच काही लोक द्राक्षाचे पण उत्पाद्न घेतात. सुस्ते गावातील ऊसाचे उत्पादन हे बाकीच्या पिकांपेक्षा जास्त आहे.शेतीकरता पाण्याचा पुरवठा चंद्र्भाग नदीवरून केला जातो. शेतीकर्ता विहिर बोरच्या पाण्याचा वापर केला जातो. लोक भरपुर प्रमाणावर ऊस लावतात. ऊसाचा उतार 100 पडतो, काहीना 80,50 पडतो.

बाजार व पतव्यवस्था-

गावात एटीएम उपलब्ध आहे. गावात व्यापारी बँक, सहकारी बँक आहे. गावात रेशन दुकान आहे.आठवडयाचा बाजार दर रविवारी भरतो. या बाजारात सर्व प्रकारच्या पालेभाज्या भेटतात.

धर्मीक कार्यक्रम अंबिका देवी - श्री अंबिका देवी ही सुस्ते गावाची ग्रामदेवता असुन या देविची यात्रा में महिन्यात वैशाख शुद्ध पूर्णिमेला असते. देवीच्या यात्रा काळात पाहुणे मंडळी विविध गावाहून सुस्ते या ठीकाणी येतात. यात्रेची सागता देवीच्या पालखी मिरवणूकीने केली जाते. नवरात्रिच्या काळात नऊ दिवस सकाळी देवीची पूजा खुप मोठ्या प्रमाणात केली जाते. सीमोलेंघना दिवशी गावातील पाटील याच्या मानाच्या तलवारीची पूजा करून देवीचा अभिषेक केला जातो त्यानंतर देवीला मंचकी निद्रा दिली जाते आणि पौणिमा दिवशी देविचा महाभिषेक करून देवीला निद्रेतून जागे केले जाते.

श्रियाल षष्ठी (गौर) - नागपंचमीच्या सणानतर दुसऱ्या दिवशी हा सण साजरा केला जातो या सणाचे महत्त्व असे की हा स्त्रियांचा सण म्हणून साजरा केला जातो.त्यात बारा बलुतेदार व ९६ कुली मराठे यांना याचा मान असून गावातील प्रमुख पाटील व भोसले (पाटील) यांच्या घरी हा सण साजरा केला जातो.सकाळपासून या कार्यक्रमाची लगबग सुरू होते मातंग समाजातील लोकांनी या पुजेसाठी लगणारी माती आणणे  व कुंभार समजातील लोकांनी ती गौर तयार करणे.

कृषी व्यवसाय

कमी पावसाचा प्रदेश आहे तरी शेतकरी शेतामध्ये ऊस, डाळीब, द्राक्ष या सारकी पीके घेतात. काही लोक मका लावतात.

सुस्ते गावात सर्व प्रकारच्या वनस्पती आहेत. या गार्डन मधिल काही वनस्पती हा अध्रप्रदेश मधला आहेत. आंबा,चिकू,आवळा,पपया,अजीर,नारळ,मोसंबी,डाळीब,पेरू,सीताफळ,जाभुळ, करवंद,

मोगरा, जास्वंद, करदळ, केवड़ा, गुलाब, कागदी फुल, चाफा, मे फ़ुल, ब्राम्हकमल, गोकर्ण, निशीगंध.

रस्ते सुस्ते हे पंढरपूर सोलापूर रोड वरती आहे. हा गावत सिमेंट रोड आहेत. गावातून तिन रोड आहेत.