Jump to content

सुलोचना लाटकर

सुलोचना लाटकर
सन २०१० मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराचे वेळी सुलोचना लाटकर
जन्म ३० जुलै १९२८
मृत्यू ४ जून, २०२३ (वय ९४)[]
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
पुरस्कार 'चित्रभूषण' व 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने सन्मानित
टिपा
हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेत्री

हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील श्रेष्ठ अभिनेत्री सुलोचना (लाटकर). त्यांचा जन्म ३० जुलै १९२८ रोजी झाला. सन १९४३ला त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटात चरित्र अभिनेत्री/ घरंदाज आई म्हणून काम केले. भालजी पेंढारकरांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. त्या चित्रपटात आल्या तेव्हा त्यांची भाषा शुद्ध नव्हती. त्यांच्या बोलण्याची थट्टा व्हायची. भालजी पेंढारकर यांनी त्यांची भाषा सुधारावी म्हणून एक संस्कृत मासिक त्यांच्याकरता लावले. ते वाचणे हे चांगलेच क्लिष्ट काम होते. पण त्याबद्दल तक्रारीचा चकार शब्द न काढता सुलोचनाबाई चिकाटीने त्या भाषादिव्यातून गेल्या. त्यांची थट्टा व नक्कल करणारे महाभाग ‘पारिजातक’च्या चित्रीकरणाच्या वेळी सुलोचनाबाई संस्कृतप्रचुर संवाद अस्खलितपणे बोलताना पाहून थक्क झाले.

भालजी पेंढारकर यांच्या दिग्दर्शनाच्या तालमीत तयार झालेल्या सुलोचनाबाईंची प्रतिमा लाखो चित्रपट रसिकांच्या मनात चित्रपटातील आई अशीच आहे. सोज्वळ, शांत आणि घरंदाज भूमिका त्यांनी पडद्यावर जिवंत केल्या. शेकडो मराठी आणि अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी अशा भूमिका केल्या. शिवाय यांनी अन्य भूमिकाही केल्या आहेत.

१९४३ला हिंदी चित्रपट सृष्टीत सहकलाकार म्हणून पृथ्वीराज कपूर यांच्या बरोबर अभिनयाची सुरुवात करून पुढे राजकपूर, शम्मीकपूर, शशीकपूर या कपूर घराण्याच्या दुसऱ्या पिढीबरोबर आणि नंतर, कपूर घराण्याच्या तिसऱ्या पिढीच्या रणधीर कपूर, ऋषी कपूर, गीता बाली, बबिता, नीतू सिंग यांच्या बरोबरही त्यांनी हिंदी चित्रपटातील काळ गाजवला. २५०हून अधिक मराठी तसेच हिंदी चित्रपटांत त्यांनी आपल्या अभियानाची छाप पाडली. वहिनीच्या बांगड्या, मीठ भाकर, धाकटी जाऊ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत.

निवडक चित्रपट

वर्षमथळाअभिनयभाषा
१९५७अब दिल्ली दूर नहीबेलाहिंदी
१९६८आदमी (१९६८)शेखरची आईहिंदी
१९७०कटी पतंगदिनानाथ यांची पत्नीहिंदी
१९८६काला धंदा गोरे लोगहिंदी
१९७०जॉनी मेरा नामसोहन व मोहनची आईहिंदी
१९५९दिल देके देखोजमुनाहिंदी
१९६६देवरशकुंतला एम सिंगहिंदी
१९६३बंदिनीहिंदी
१९६४मराठा तितुका मेळवावाजीजाबाईमराठी
१९७०मैं सुंदर हुंसुंदरची आईहिंदी
१९६८संघर्षशंकरची पत्नीहिंदी
१९६१संपूर्ण रामायणकैकेयीहिंदी
१९६८सरस्वतीचंद्र (चित्रपट)कुमुदची आईहिंदी
१९५९सांगत्ये ऐकासखारामची पत्नीमराठी
१९६५साधी माणसेमराठी

अन्य चित्रपट

  • एकटी
  • गुलामी (हिंदी)
  • धाकटी जाऊ
  • पायदळी पडलेली फुले
  • पारिजातक
  • माझं घर, माझी माणसं
  • मीठभाकर
  • मुक्ती (हिंदी)
  • मोलकरीण
  • वहिनींच्या बांगड्या
  • सुजाता (हिंदी)

उल्लेखनीय

महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा २००९चा ‘महाराष्ट्र भूषण’ हा सर्वोच्च पुरस्कार अभिनेत्री सुलोचना यांना दिला गेला.


संदर्भ

  1. ^ "अभिनयातील वात्सल्यमूर्ती हरपली!, ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदींचे". दैनिक लोकमत.