Jump to content

सुरेश चिखले

सुरेश चिखले (इ.स. १९४९ - १२ सप्टेंबर, इ.स. २०१५:मुंबई, महाराष्ट्र) हे एक नामवंत मराठी अभिनेते व नाटककार होते.

चिखले यांनी इंडियन नॅशनल थिएटर अर्थात आयएनटीमधून लेखनाची तालीम घेतली होती. त्यांनी विविध आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमधून लेखन आणि अभिनय केला होता. कॉ. कृष्णा देसाई खून खटल्यावर आधारित त्यांनी लिहिलेल्या एकांकिकेला आयएनटीच्या स्पर्धेत लेखन आणि दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले होते तर गुरू नावाच्या एकांकिकेसाठी त्यांना अभिनयाचेही पारितोषिक मिळाले होते. आएनटीच्या ती फुलराणी, कोंडी या नाटकात चिखले यांनी अभिनय केला होता. आयएनटीच्या लोककला संशोधन केंद्रासाठीही त्यांनी काही काळ काम केले होते.

नाटके

  • अकस्मात
  • कोंडी (अभिनय)
  • खंडोबाचं लगीन (लेखन)
  • गच्च भरलेलं आभाळ
  • गुरू (अभिनय)
  • गोलपिठा (लेखन) - वेश्यांच्या जीवनावर चिखले यांनी लिहिलेल्या गोलपिठा नाटकाला मुंबईत काही नाटय़गृहात प्रयोग करण्यास बंदी होती. ही बंदी उठविली जावी, त्यासाठी काही मान्यवर साहित्यिकांसाठी या नाटकाचा खास प्रयोग त्यावेळी सादर करण्यात आला. त्यांच्या सहमतीने ही बंदी उठवली गेली. पुढे राज्य नाटय़ व्यावसायिक स्पर्धेत या नाटकाला सवरेत्कृष्ट नाटकाचा पहिला पुरस्कारही मिळाला.
  • (लोकमहाभारत अर्थात्‌) जांभूळ आख्यान (लेखन)
  • ती फुलराणी (अभिनय)
  • प्रपोजल (लेखन)
  • शंभूराजे (लेखन). या नतकाचे साडेतीनशेच्या आसपास प्रयोग झाले.