Jump to content

सुरेखा पुणेकर

सुरेखा पुणेकर
राष्ट्रीयत्वभारत भारतीय
कार्यक्षेत्र लावणी नृत्यांगना
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रमबिग बॉस मराठी २

सुरेखा पुणेकर ह्या भारतीय लावणी नृत्यांगना आहेत. बैठकीच्या लावणीला पांढरपेशा समाजात आणि महिला वर्गात लोकप्रिय करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. सुरुवातीला त्या ईतरांच्या तमाशा फडात लावण्या गात आणि सादर करीत असत. १९९० च्या उत्तरार्धात त्यांनी श्री बाबा पठाण आणि दिवंगत लोकशाहीर श्री बशीर मोमीन कवठेकर यांच्या साह्याने स्वतःचा तमाशा फड सुरू केला परंतु त्यात म्हणावेसे यश न मिळाल्याने त्यांनी पुन्हा बैठकीच्या लावण्याच्या 'नटरंगी नार' असा कार्यक्रम सुरू केला. यात त्यांना भरपूर यश मिळाले आणि त्यांना परदेशात सुद्धा हा कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळाली.