Jump to content

सुमेधा कामत देसाई

सुमेधा आनंदराव कामत प्रभू पार्सेकर देसाई या एक कोंकणी-मराठी लेखिका आहेत.

या मूळच्या पारोड (केंपे, गोवा) येथील आहेत. त्या मराठी आणि संस्कृतच्या प्राध्यापिका आहेत.

पुस्तके

  • आंबाड्याच्या घरात (कोंकणी, २०१४)
  • आलतड पलतड (कोंकणी, २०१३)
  • उपवन (मराठी, १९९७)
  • चंद्रकोरीच्या चार कला (मराठी, प्रवासवर्णन, २०१६)
  • चित्रंगी (मराठी, ललितगद्य) (१९९७)
  • तेफळां घोंस (विनोदी, कोंकणी) (२०१०)
  • देवकापसाची वात (कोंकणी. निसर्ग, लोकजीवन आणि संस्कृतीविषयक) (मराठी, २००७)
  • देवांचे काव्य (मराठी, प्रवासवर्णन) (२०१०)
  • निवलकांडयेचीं बोंडां (विनोदी, कोंकणी) (२०१२)
  • नैनी डेज (मराठी, प्रवासवर्णन) (१९९५)
  • पालवा पान (कोंकणी. निसर्ग, लोकजीवन आणि संस्कृतीविषयक) (२०१२)
  • पोपटी रेषा (मराठी, प्राणिविषयक) (२०१६)
  • मैत्र जीवांवे (मराठी, ललितगद्य) (२०१६)
  • रानभूल (मराठी, प्राणिपक्ष्यांवरचे ललितगद्य) (१९९४) (२०१४)
  • विवेकानंदपुरमांत (कोंकणी, प्रवासवर्णन) (१९९३)
  • शेवण्या पिपुशा (कोंकणी, प्राणिपक्षीविषयक ललितगद्य) (१९९७)
  • शेळी सांत (विनोदी, कोंकणी) (२०१५)
  • सतत अणि अथक (मराठी, प्रवासवर्णन) (२०१५)
  • सूर्यप्रकाश आणि समुद्र (मराठी, प्रवासवर्णन) (२०१५)

पुरस्कार

  • ‘आंबाड्याच्या घरात’ला गोवा महिला आणि बालविकास खात्याकडून ‘यशोदामिनी’ पुरस्कार (२०११-१२)
  • ‘आंबाड्याच्या घरात’ला गोव्यातील बिम्ब प्रकाशनाचा ‘शंकर भांडारी विनोदी कोंकण साहित्य पुरस्कार’ (२०१३)
  • ‘उपवन’ला गोमंतक मराठी अकादमीचा पुरस्कार
  • गोवा राज्य शिक्षण संचालनालयातर्फे ‘आदर्श अध्यापक राज्य पुरस्कार’.(२०१५-१६)
  • ‘रानभूल’चा गोवा विद्यापीठातील अभ्यासक्रमात समावेश (२०१४)
  • ‘रानभूल’ला गोमंतक मराठी अकादमीचा पुरस्कार
  • ‘रानभूल’ला महाराष्ट्र राज्याचा प्रथम प्रकाशन - ललितगद्य उत्कृष्ट साहित्य पुरस्कार (१९९६)
  • ‘रानभूल’ला बेळगावच्या सांगाती अकादमीचा पुरस्कार
  • ‘विवेकानंदपुरमांत’ला १९९३ सालचा गोवा कला अकादमीचा पुरस्कार
  • ‘विवेकानंदपुरमांत’ला मणिपालच्या डॉ. टी.एम.ए. पै फाऊंडेशनचा पुरस्कार