सुमित्रा महाजन
सुमित्रा महाजन | |
लोकसभेच्या १६ व्या अध्यक्ष | |
विद्यमान | |
पदग्रहण ५ जून २०१४ | |
मागील | मीरा कुमार |
---|---|
लोकसभा सदस्य इंदूर साठी | |
विद्यमान | |
पदग्रहण १९८९ | |
जन्म | १२ एप्रिल, १९४३ चिपळूण, महाराष्ट्र |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |
पती | जयंत महाजन |
सुमित्रा महाजन ( १२ एप्रिल १९४३) ह्या भारतीय जनता पक्षाच्या मध्य प्रदेशमधील वरिष्ठ नेत्या आहेत. त्या २०१४ ते २०१९ या काळात लोकसभेच्या सभापती होत्या. त्यांना २०२१ मध्ये पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला.[१][२]
१९८४-८५ दरम्यान इंदूर शहराच्या उपमहापौर पदावर राहिलेल्या महाजन १९८९ सालापासून इंदूर मतदारसंघामधून सलग ८ वेळा निवडून आल्या आहेत व सध्या सर्वाधिक काळ लोकसभा सदस्य राहिलेल्या महिला आहेत. ६ जून २०१४ रोजी त्यांची सोळाव्या लोकसभेच्या अध्यक्षपदावर बिनविरोध निवड करण्यात आली.
पुरस्कार
इ.स. २०२०चा पद्मभूषण पुरस्कार दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला.[३]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "शिंजो आबे, बालसुब्रमण्यम यांना पद्मविभूषण तर सुमित्रा महाजन यांना पद्मभूषण". Dainik Prabhat (इंग्रजी भाषेत). 2021-01-25. 2021-01-26 रोजी पाहिले.
- ^ "Padma Awards | Interactive Dashboard". www.dashboard-padmaawards.gov.in (इंग्रजी भाषेत). 2021-02-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-01-26 रोजी पाहिले.
- ^ "Padma Awards 2020: यंदाचा पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा दिल्लीतील राष्ट्रपती भवनात संपन्न, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार देऊन गौरव". एबीपी माझा. 2021-11-08 रोजी मूळ पानापासून संग्रहित. ८ नोव्हेंबर २०२१ रोजी पाहिले.