Jump to content

सुमित्रा गुहा

सुमित्रा गुहा (पूर्वाश्रमीच्या सुमित्रा राजू) या भारतीय शास्त्रीय गायिका आहेत. यांची आई राज्यलक्ष्मी राजू याही शास्त्रीय गायिका होत्या.

गुहा यांनी सुरुवातीस आपल्या आईकडून आणि नंतर त्या एस.आर. जानकीरामन यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. २०१०मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला.