सुमित्र मंगेश कत्रे
डॉ. सुमित्र मंगेश कत्रे हे संस्कृत, प्राकृत, कोकणी या भाषांचे अभ्यासक होते. उच्च शिक्षणक्षेत्रामधील कुशल संघटक,आधुनिक भाषाशास्त्राची भारतात प्रतिष्ठापना करणाऱ्यांत अग्रगण्य होते.
त्यांचा जन्म होनावर, जि. कारवार येथे झाला.
शिक्षण
शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मंगलोर येथे झाले.
१९३० मध्ये एम. ए. झाल्यानंतर लंडन व बॉन विद्यापीठांत संस्कृत, प्राकृत व भाषाशास्त्र ह्यांचा अभ्यास केला. १९३१ लंडन मध्ये पीएच.डी. केली.
कामे
पुण्यातील वाडिया महाविद्यालय, सर परशुरामभाऊ महाविद्यालय व डेक्कन कॉलेज येथे अध्यापन केले.
संस्कृत ऐतिहासिक महाकोश योजनेचे संस्थापक व प्रमुख संपादक.
डेक्कन कॉलेजमध्ये रॉकफेलर प्रतिष्ठानाच्या आर्थिक साहाय्याने भाषाभ्यास प्रकल्प राबवून (१९५४–६०) आधुनिक भाषाशास्त्राच्या अभ्यासाला भारतभर चालना दिली.
इतर
- भाषाशास्त्र-प्रगत-अध्ययन-केंद्राचे संचालक (१९६३-६९).
- अनेक शोधपत्रिकांचे संपादन
- ‘लिंग्विस्टिक सोसायटी ऑफ इंडिया’ इ. संस्थांचे संवर्धन
- विशेष व्याख्यानमालांमधून भाषणे
- अनेक देशीविदेशी परिषदांमधून भाग
प्रमुख ग्रंथरचना
- इंट्रोडक्शन टू इंडियन टेक्स्चुअल क्रिटिसिझम (१९४१)
- फॉर्मेशन ऑफ कोंकणी (१९४२)
- सम प्रॉब्लेम्स ऑफ हिस्टॉरिकल लिंग्विस्टिक्स इन इंडो-आर्यन (१९४४)
- पाणिनियन स्टडीज (४ भाग, १९६७-६९) इत्यादी.
यांशिवाय अनेक निबंध, व्युत्पत्तिस्फुटे, परीक्षणे.