सुभेदार (चित्रपट)
सुभेदार | |
---|---|
दिग्दर्शन | दिग्पाल लांजेकर |
प्रमुख कलाकार | चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | १८ ऑगस्ट २०२३ |
सुभेदार हा दिग्पाल लांजेकर लिखित आणि दिग्दर्शित एक आगामी भारतीय मराठी भाषेतील ऐतिहासिक नाट्यपट आहे, जो सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनाचा मागोवा घेणारा शिवराज अष्टकचा पाचवा भाग आहे. या चित्रपटाची निर्मिती मूलाक्षर प्रॉडक्शन, रजवारसा प्रॉडक्शन, पृथ्वीराज प्रॉडक्शन, राजाऊ प्रॉडक्शन, परंपरा प्रॉडक्शन्स यांनी केली आहे आणि ए ए फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट द्वारे त्याचे वितरण केले जाते. या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अजय पूरकर यांच्या भूमिका आहेत. हे १८ ऑगस्ट २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.[१]
सुभेदारची घोषणा २०२२ मध्ये दिग्पाल लांजेकर यांनी जून २०२३ मध्ये रिलीज होणार असलेल्या चित्रपटाच्या पोस्टरसह केली होती.[२][३] २१ जून २०२३ रोजी टीझरद्वारे नवीन प्रकाशन तारीख जाहीर करण्यात आली.[४] तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत अजय पूरकरचे फर्स्ट लूक पोस्टर दिग्पाल लांजेकर यांनी ३० जून २०२३ रोजी उघड केले.[५] २५ ऑगस्टहून १८ ऑगस्ट २०२३ अशी चित्रपट प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली.[६]
कलाकार
- चिन्मय मांडलेकर
- अजय पूरकर
- मृणाल कुलकर्णी
- समीर धर्माधिकारी
- स्मिता शेवाळे
- शिवानी रांगोळे
- अस्ताद काळे
- मृण्मयी देशपांडे
- ऋषी सक्सेना
- अभिजीत श्वेतचंद्र
- विराजस कुलकर्णी
संदर्भ
- ^ "Subhedar Movie: सुभेदार सिनेमाची रिलीज डेट बदलली पण चाहत्यांना मोठा आनंद, पहा नवीन तारीख". सकाळ. 2023-07-18 रोजी पाहिले.
- ^ "Subhedar: शिवराज अष्टकातील पाचवा थरार!दिग्पालने केली 'सुभेदार'ची घोषणा." सकाळ. 2023-06-21 रोजी पाहिले.
- ^ "'Subhedar': Digpal Lanjekar announces his next series on 'Subhedar Tanaji Malusare'". The Times of India (इंग्रजी भाषेत). 13 October 2022. ISSN 0971-8257. 2023-06-21 रोजी पाहिले.
- ^ "ओम राऊतच्या 'तान्हाजी'ला टक्कर देण्यासाठी दिग्पाल लांजेकरचा 'सुभेदार' सज्ज!". एबीपी माझा. 21 June 2023. 2023-06-21 रोजी पाहिले.
- ^ "अजय पुरकर यांच्या 'सुभेदार' चित्रपटातील लूकनं वेधलं लक्ष". एबीपी माझा. 30 June 2023. 2023-07-02 रोजी पाहिले.
- ^ "'मावळं जागं झालं रं...'; 'सुभेदार' सिनेमातील पहिलंवहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला". एबीपी माझा. 2023-07-18. 2023-07-19 रोजी पाहिले.