Jump to content

सुभाष घिशिंग

सुभाष घिशिंग (इ.स. १९३८ - २९ जानेवारी, इ.स. २०१५) हे गुरखा नॅशनल लिबरेशन फ्रंटचे (जीएनएलएफ) संस्थापक होते.

घिशिंग यांनी १९८० मध्ये जीएनएलएफची स्थापना केली. पश्चिम बंगालमध्ये स्वतंत्र गुरखा राज्यासाठी त्यांनी आंदोलन उभारले. या आंदोलनाला १९८६ ते ८८ दरम्यान हिंसक वळण लागले. केंद्र व पश्चिम बंगाल सरकारच्या चर्चेनंतर अखेर दार्जिलिंग गुरखा परिषदेची स्थापना करण्यात आली. सुभाष घिशिंग या गुरखा परिषदचे १९८८ ते २००८ या कालावधीपर्यंत अध्यक्ष होते.

घिशिंग हे १९५४ ते १९६० या कालावधीत गुरखा रायफल्समध्ये होते. गुरख्यांच्या हक्कांसाठी त्यांनी १९६८ मध्ये राजकीय पक्षाची स्थापना केली होती. २०११ मध्ये त्यांच्या पक्षाने दार्जिलिंगमध्ये तीन जागी विधानसभा निवडणूक लढवली, मात्र त्यात अपयश आले. त्यानंतर ते राजकीय विजनवासात गेले.

२९ जानेवारी २०१५ रोजी, वयाच्या ७८व्या वर्षी सुभाष घिशिंग यांचे यकृताच्या कर्करोगामुळे निधन झाले.