Jump to content

सुभाष घई

सुभाष घई
जन्म २४ जानेवारी, १९४५ (1945-01-24) (वय: ७९)
नागपूर, मध्य प्रांत, ब्रिटिश भारत (आजचा महाराष्ट्र)
राष्ट्रीयत्वभारत
कार्यक्षेत्र चित्रपट दिग्दर्शक, निर्माता
कारकीर्दीचा काळ १९७० - चालू
पत्नी मुक्ता घई
अधिकृत संकेतस्थळhttp://muktaarts.com/

सुभाष घई ( जानेवारी २४, इ.स. १९४५) हा एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व पटकथालेखक आहे. त्याने इ.स. १९८२ साली मुक्ता आर्ट्स नावाची चित्रपटनिर्मिती कंपनी स्थापली. त्याने निर्मिलेल्या चित्रपटांतील कर्ज (इ.स. १९८०), हीरो (इ.स. १९८३), मेरी जंग (इ.स. १९८५), राम लखन (इ.स. १९८९), सौदागर (इ.स. १९९१), खलनायक (इ.स. १९९३), परदेस (इ.स. १९९७) व ताल (इ.स. १९९९) हे चित्रपट लोकप्रिय ठरले. सौदागर ह्या चित्रपटासाठी त्याला १९९२ सालचा सर्वोत्तम दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

चित्रपट यादी

वर्षचित्रपटकार्य
1969आराधनाअभिनय
1972भारत के शहीदअभिनय
1976कालिचरणदिग्दर्शक
1978विश्वनाथदिग्दर्शक
1979गौतम गोविंदादिग्दर्शक
1980कर्जदिग्दर्शक
1981क्रोधीदिग्दर्शक
1982विधातादिग्दर्शक
1983हीरोनिर्माता, दिग्दर्शक
1985मेरी जंगदिग्दर्शक
1986कर्मानिर्माता, दिग्दर्शक
1989राम लखननिर्माता, दिग्दर्शक
1991सौदागरनिर्माता, दिग्दर्शक
1993खलनायकनिर्माता, दिग्दर्शक
1995त्रिमूर्तिनिर्माता
1997परदेसनिर्माता, दिग्दर्शक
1999तालनिर्माता, दिग्दर्शक
2001यादेंनिर्माता, दिग्दर्शक
2003जॉगर्स पार्कनिर्माता
2003एक और एक ग्यारहनिर्माता
2004ऐतराजनिर्माता
2005किसनानिर्माता, दिग्दर्शक
2005इक्बालनिर्माता
2006३६ चायना टाउननिर्माता
2006शादी से पहलेकार्यकारी निर्माता
2006अपना सपना मनी मनीनिर्माता
2007गूड बॉय, बॅड बॉयनिर्माता
2008ब्लॅक ॲन्ड व्हाईटनिर्माता, दिग्दर्शक
2008युवराजनिर्माता, दिग्दर्शक
2014कांची: द अनब्रेकेबलनिर्माता, दिग्दर्शक

बाह्य दुवे

  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील सुभाष घई चे पान (इंग्लिश मजकूर)