Jump to content

सुब्रोतो मुखर्जी

सुब्रोतो मुखर्जी (बंगाली:সুব্রত মুখার্জী) (५ मार्च, १९११ - ८ नोव्हेंबर, १९६०) हे भारतीय वायुसेनेचे पहिले वायुसेना प्रमुख होय. बंगाली कुटुंबात जन्मलेल्या मुखर्जी यांचे शिक्षण भारतात तसेच इंग्लंडमध्येही झाले. ते रॉयल एर फोर्समध्ये सामील झाले आणि नंतर भारतीय वायुसेनेमध्ये दाखल झालेल्या पहिल्या अधिकाऱ्यांपैकी एक होते. १९६० साली त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांना "भारतीय वायुसेनेचे पितामह" म्हणले जाते.