Jump to content

सुब्रमण्यन स्वामी

सुब्रह्मण्यम स्वामी

अध्यक्ष, जनता पक्ष
विद्यमान
पदग्रहण
इ.स. १९८९

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री
कार्यकाळ
इ.स. १९९० – इ.स. १९९१
पंतप्रधान चंद्रशेखर

केंद्रीय कायदा मंत्री
अधिक भार
कार्यकाळ
इ.स. १९९० – इ.स. १९९१
पंतप्रधान चंद्रशेखर

कार्यकाळ
इ.स. १९८८ – इ.स. १९९४
कार्यकाळ
इ.स. १९७४ – इ.स. १९७६

कार्यकाळ
इ.स. १९८८ – इ.स. १९९४
मतदारसंघ मदूरै
कार्यकाळ
इ.स. १९९८ – इ.स. १९९९

जन्म १५ सप्टेंबर, इ.स. १९३९
चेन्नई, तामिळनाडू
राजकीय पक्ष जनता पक्ष
पत्नी डॉ. रोक्स्ना स्वामी
निवास नवी दिल्ली/चेन्नई
गुरुकुल हिंदू कॉलेज, दिल्ली (बी.एस.)
भारतीय सांख्यिकी संस्था, कलकत्ता(एम.ए)
हार्वर्ड विद्यापीठ (पी.एच.डी.)
व्यवसाय लेखक, अध्यापक, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी
धर्म हिंदू
संकेतस्थळ http://www.janataparty.org/president.html

डॉ. सुब्रमण्यन स्वामी अथवा सुब्रमण्यम स्वामी (१५ सप्टेंबर, इ.स. १९३९,चेन्नई[] - हयात) एक भारतीय नेता, शिक्षणतज्ज्ञ, प्राध्यापक व एक अर्थशास्त्रज्ञ आहेत.[] सध्या ते जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.[]

राजकीय कारकीर्द

सुब्रमण्यम स्वामी ५ वेळा भारतीय लोकसभेत खासदार राहिले आहेत. ते १९९० -९१ या काळात केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री - व्यापार, कायदा व न्याय मंत्री होते.[]

शैक्षणिक कार्य

हार्वर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेटची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी नोबेल पारितोषिक विजेते सायमन कुझनेट्स व पॉल सॅमुएल्सन यांच्या सोबत संशोधन कार्य केले व यांच्या सोबत संयुक्त लेखक रूपात "इंडेक्स नंबर थेअरी" या विषयावर एक नवीन व पथ प्रदर्शक अध्ययन प्रस्तुत केले. ते हार्वर्ड विद्यापीठात सन्माननीय पाहुणे अध्यापक म्हणून जात असत[]. २०११ मध्ये त्यांनी इस्लामविषयी लिहिलेल्या लेखामुळे त्यांचे अध्यापन बंद करण्यात आले. []

सामाजिक लढा व कार्य

त्यांनी कायम आपल्या तत्त्वांसाठी निर्भयपणे संघर्ष केला आहे. आणीबाणी दरम्यान ऐतिहासिक साहसी संघर्ष, तिबेट मधील कैलाश-मानसरोवर यात्री मार्ग खुला करण्यासाठी प्रयत्न, भारत - चीन संबंधांत सुधारणा, भारत - इस्रायल संबंधांत सुधारणा, आर्थिक सुधारणा व हिंदू पुनरुत्थान, इत्यादी काही बाबी त्यांच्या ठळक कार्यांपैकी आहेत.

२ जी तरंग भ्रष्टाचार उघड करून दोषींवर कारवाई करवण्यात त्यांच्या न्यायालयीन लढाईचा मोठा हात आहे. []

संदर्भ

  1. ^ a b "संसदेच्या संकेतस्थळावरील सुब्रमण्यन स्वामींचे चरित्र" (इंग्रजी भाषेत). ३ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले.
  2. ^ a b "Swamy to teach at Harvard" (इंग्रजी भाषेत). ३ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले.
  3. ^ "जनता पक्षाच्या संकेतस्थळावर सुब्रमण्यन स्वामींची माहिती" (इंग्रजी भाषेत). ३ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले.
  4. ^ "Harvard Faculty Debates Free Speech" (इंग्रजी भाषेत). ३ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले.
  5. ^ "How Swamy busted the 2G scam" (इंग्रजी भाषेत). ३ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले.

बाह्य दुवे