Jump to content

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे (पूर्वाश्रमीच्या पवार; ३ जून १९६९) या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भारतीय राजकारणी आहेत. सध्या त्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या १७ व्या लोकसभेतील खासदार आहेत. त्यांनी यापूर्वी १५व्या आणि १६व्या लोकसभेत खासदार म्हणून काम केले आहे.

२०११ मध्ये त्यांनी स्त्री भ्रूणहत्येविरोधात राज्यव्यापी मोहीम सुरू केली. [] अलीकडेच त्यांना सामाजिक सेवेसाठी ऑल लेडीज लीगतर्फे मुंबई महिला ऑफ द डिकेड अचिव्हर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. []

सुप्रिया सदानंद सुळे

लोकसभा सदस्य
बारामती साठी
विद्यमान
पदग्रहण
इ.स. २००९
मागील शरद पवार

राज्यसभा सदस्य
कार्यकाळ
सप्टेंबर, इ.स. २००६ – इ.स. २००९

जन्म ३० जून, १९६९ (1969-06-30) (वय: ५५)
पुणे
राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
पती सदानंद सुळे
धर्म हिंदू


प्रारंभिक जीवन

सुप्रिया सुळे यांचा जन्म भारतीय राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या पोटी ३० जून १९६९ रोजी पुण्यात झाला. त्यांचे शिक्षण मुंबईतील जय हिंद कॉलेजमध्ये झाले. त्यांनी सूक्ष्मजीवशास्त्र विषयावर बीएस्सी पदवी घेतली.

राजकीय कारकीर्द

सुळे सप्टेंबर २००६ मध्ये महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून आल्या होत्या.[] त्या मुंबईतील नेहरू सेंटरच्या विश्वस्त आहेत.

त्यांनी स्त्री भ्रूणहत्येविरोधातील राज्यस्तरीय मोहिमेचे नेतृत्व केले. या मोहिमेत पदयात्रा, महाविद्यालयीन कार्यक्रम, स्पर्धा इत्यादींचा समावेश होता. []

२०१२ मध्ये सुळे यांच्या नेतृत्वाखाली तरुणींना राजकारणात व्यासपीठ देण्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेस या संघटनेची स्थापना करण्यात आली. अनेक महिन्यांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात स्त्रीभ्रूण गर्भपात, हुंडापद्धती आणि सर्वसाधारणपणे महिला सक्षमीकरणावर भर देणारे अनेक मोर्चे त्यांनी काढले. []

लोकसभेच्या सदस्या म्हणून सुळे यांना त्यांच्या संसदीय कार्यासाठी ओळखले जाते. अनेक वेळा लोकसभेतील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खासदारांपैकी एक म्हणून त्या उदयास आल्या. []

वैयक्तिक जीवन

४ मार्च १९९१ रोजी सदानंद भालचंद्र सुळे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना एक मुलगा (विजय) आणि एक मुलगी (रेवती) ही दोन अपत्ये आहेत. []लग्नानंतर त्यांनी कॅलिफोर्नियामध्ये काही काळ घालवला, जिथे त्यांनी यूसी बर्कलेमध्ये जल प्रदूषणाचा अभ्यास केला. त्यानंतर त्या इंडोनेशिया आणि सिंगापूरला गेल्या आणि नंतर मुंबईला परतल्या. []

संदर्भ

  1. ^ "Supriya Sule to launch statewide campaign against female foeticide". Daily Bhaskar. 16 ऑगस्ट 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 ऑगस्ट 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "Women of the Decade". 7 January 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 January 2014 रोजी पाहिले.
  3. ^ "Rajya Sabha members". 9 January 2010 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2009-12-31 रोजी पाहिले.
  4. ^ "Supriya Sule to launch statewide campaign against female foeticide". DNA India (इंग्रजी भाषेत). 2022-07-10 रोजी पाहिले.
  5. ^ "Young, female and a march ahead - Indian Express". archive.indianexpress.com. 2022-07-10 रोजी पाहिले.
  6. ^ "MP Supriya Sule Emerges As Best Performer In Lok Sabha Second Time - SheThePeople TV" (इंग्रजी भाषेत). 2022-07-10 रोजी पाहिले.
  7. ^ "Supriya Sule - Biography". 31 October 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 August 2011 रोजी पाहिले.
  8. ^ Jog, Sanjay (11 जून 2010). "Business Standard". Business Standard India. 7 जून 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 ऑगस्ट 2011 रोजी पाहिले.