Jump to content

सुनील कर्णिक


सुनील कर्णिक हे एक मराठी लेखक आहेत. 'आश्लेषा' नावाच्या दिवाळी अंकाचे ते संपादक असतात. हे व्यवसायाने पत्रकार आहेत. ग्रंथव्यवहारासंबंधी ते सर्व कामे करतात. साधारण १९७० च्या दशकापासून या जगताशी संबंधित राहिलेल्या व त्या निमित्ताने लेखन केलेल्या कर्णिकांचे पहिले पुस्तक,' न छापण्याजॊग्या गोष्टी' हे सन २००० साली प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीसह डिंपल प्रकाशनाने त्यांची सहा पुस्तके एकाच दिवशी प्रसिद्ध केली.

सुनील कर्णिक यांनी लिहिलेली पुस्तके

  • न छापण्याजोग्या गोष्टी (ललित)
  • मलिक अंबर, माहितीचा कचरा आणि नेमाडे
  • महानगरचे दिवस (इतिहास)
  • महाराष्ट्रातील साहित्यिक संस्थानं
  • म्हाताऱ्या बायका काय कामाच्या !
  • सोनं आणि माती म्हणजे गुणवंतांच्या गोष्टी (कथासंग्रह)