सुदेश लहरी
Indian actor | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | ऑक्टोबर २७, इ.स. १९६८ जालंधर | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
सुदेश लहरी (जन्म: २७ ऑक्टोबर १९६८) हा एक भारतीय स्टँड-अप कॉमेडियन आणि चित्रपट व दूरदर्शन अभिनेता आहे. २००७ मध्ये द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज III या विनोदी कार्यक्रमात त्याने भाग घेतला होता. [१] कपिल शर्मा आणि चंदन प्रभाकर यांच्यानंतर तो या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर होता.
त्यानंतर सुदेशने कॉमेडी सर्कसमध्ये कृष्णा अभिषेकसोबत भागीदारी करत स्पर्धक म्हणून खेळला. एकत्रितपणे या दोघांनी तीन हंगाम जिंकले आणि "कृष्णा-सुदेश" म्हणून लगेचच लोकप्रियता मिळवली. कॉमेडी नाईट्स बचाओ, कॉमेडी नाईट्स लाइव्ह, आणि कॉमेडी नाईट्स बचाओ ताझा या कार्यक्रमांत देखील ही जोडी एकत्रितपणे दिसली.
सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील द ड्रामा कंपनी हा त्याचा नवीनतम कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तो बॉलीवूड अभिनेता मिथुन चक्रवर्तीसोबत काम करत आहे.[२][३] तो आणि कृष्णा अभिषेक ४ वर्षांनंतर कपिल शर्मा शोमध्ये पुन्हा एकत्र आले.[४]
खाजगी जीवन
सुदेशचा जन्म पंजाबच्या जलंधर येथे २७ ऑक्टोबर १९६८ रोजी झाला होता. ममता ही त्याची पत्नी असून या दाम्पत्याला २ अपत्ये आहेत.
दूरचित्रवाणी कार्यक्रम
- दूरदर्शन मालिका
वर्ष | कार्यक्रम | भूमिका | शैली | वाहिनी | नोट्स |
---|---|---|---|---|---|
2007 | द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज III | स्वतः | स्टँडअप कॉमेडी / स्केच कॉमेडी | स्टार वन | |
2007 | देख भारत देख | स्वतः | सोनी टीव्ही | ||
2008-2014 | कॉमेडी सर्कस | स्वतः | स्टँडअप कॉमेडी / स्केच कॉमेडी | सोनी टीव्ही | |
2014-15 | कॉमेडी क्लासेस | विविध पात्रे | स्केच कॉमेडी | लाइफ ओके | |
2015-2017 | कॉमेडी नाइट्स बचाओ | होस्ट आणि विविध भूमिका | रोस्ट कॉमेडी | कलर्स टीव्ही | |
2016 | कॉमेडी नाइट्स लाइव्ह | स्केच कॉमेडी | कलर्स टीव्ही | ||
2017-2018 | ड्रामा कंपनी | विविध पात्रे | स्केच कॉमेडी | सोनी टीव्ही | |
2021 | कपिल शर्मा शो | सोनी टीव्ही |
संदर्भ
- ^ Wadehra, Randeep (16 September 2007). "The Great Punjabi Challenge". The Tribune. 29 June 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 28 June 2018 रोजी पाहिले.
- ^ "Sudesh Lehri joins Krushna Abhishek on his show, to give competition to Kapil's show". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2017-06-16. 2020-11-10 रोजी पाहिले.
- ^ "Sudesh Lehri reacts to comparisons between 'The Kapil Sharma Show' and 'The Drama Company'". Zee News (इंग्रजी भाषेत). 2017-07-17. 2020-11-10 रोजी पाहिले.
- ^ "Krushna Abhishek, Sudesh Lehri reunite for The Kapil Sharma Show after 2017 fallout". India Today. 28 July 2021. 6 August 2021 रोजी पाहिले.