सुदाम्याचे पोहे
सुदाम्याचे पोहे हा लेखसंग्रह श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी लिहिला. या लेख संग्रहातून त्यांनी त्यावेळी कर्ते सुधारक आणि बोलके सुधारक कसे वागत हे विनोदाच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे. कोल्हटकरांनी यासाठी तीन पात्रे निर्माण केली आणि त्यांच्याद्वारे समाजातील गुण दोष दाखविले. या विविध लेखांचे पुस्तक म्हणजे सुदाम्याचे पोहे, यातील बरेच लेख विद्यापीठातील पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आलेले आहेत.