Jump to content

सुतार (बलुतेदार)

शेतक-याला आवश्यक असणारी अवजारे बनविणे व दुरुस्ती करण्याचे काम सुतार या बलुतेदाराकडे असे. शेतीसाठी आवश्यक असणारे नांगर,पाभर, तिफण, वखर, बैलगाडी इत्यादी अवजारे सुतार बनवित असे.महाराष्ट्राच्या अनेक ग्रामीण भागात याला 'वाढई' असेही संबोधण्यात येते.

दारे, चौकटी, खिडक्या, तक्तपोस, लाकडी पलंग, दिवाण, लाकडी बांधणी असलेल्या घरांचे लाकडी स्तंभ, तुळया, छताची आखणी व लाकडाचे कोरीव कामांनी त्याचे सुशोभनही सुतारच करीत असे.

सुतारकामासाठी लागणारी पारंपारिक हत्यारे/अवजारे

  • पटाशी - वेगवेगळ्या आकाराच्या पटाश्या, ज्याचा उपयोग लाकडास खाच पाडण्यास होतो.
  • रंधा - लाकूड गुळगुळीत करण्यासाठी व त्याचा पृष्ठभाग समतल करण्यासाठी
  • वासला - एक कुऱ्हाडीसारखे अवजार, अनावश्यक जास्तीचा भाग त्वरेने काढण्यासाठी.ढोबळकामासाठी.
  • आरी - लाकडाची कापणी करण्यासाठी
  • गिरमीट - लाकडास छिद्र पाडण्यासाठी
  • पेचकस - पिळाचे खिळे अथवा पेचाचे खिळे कसण्यासाठी
  • गुण्या - काटकोन मोजण्यासाठी
  • मोजपट्टी - लांबी रुंदी, इत्यादी मोजमाप करण्यासाठी
  • [[]]
  • [[]]