सुचेता कडेठाणकर
सुचेता कडेठाणकर | |
---|---|
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
धर्म | हिंदू |
सुचेता कडेठाणकर या एक पुणे, भारतात रहाणाऱ्या महिला आहेत. जुलै १५, २०११ रोजी मंगोलियातले गोबीचे वाळवंट पायी पार करणाऱ्या या पहिल्या भारतीय व्यक्ती ठरल्या.[१][२][३]
पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी मिळाल्यावर सुचेताने पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. पुढे दोन वर्षे पत्रकारिताही केली. नंतर मात्र, कंपन्यांसाठी तांत्रिक विषयाचे लेखन करायचे काम तिने स्वीकारले. गिर्यारोहण आणि भटकंतीचा छंदही तिला बालपणापासून होता. विद्यार्थीदशेत पुणे परिसरातले गड, किल्ले तिने चालत पालथे घातले. हिमालयात जाऊन तिने भ्रमंती केली आणि एव्हरेस्टच्या बेस कॅपपर्यंत जाऊन आली. शेवटी तिने गोबी वाळवंट पार करायचे ठरवले. तिच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले असतानाही ते दुःख आवरून ती या मोहिमेच्या तयारीला लागली. मावळ भागात ती ज्या कंपनीत नोकरी करीत होती, तिथे जाण्या-येण्यासाठी वाहनाचा वापर तिने बंद केला. दररोज पंचवीस किलोमीटरची पायपीट ती या मोहिमेच्या, तयारीसाठी करीत राहिली. काहीही झाले तरी हे वाळवंट पार करायचेच, असा तिचा निर्धार होता. पुण्यातली "एड्युरो अॅडव्हेंचर रेस' जिंकणाऱ्या या सुचेताने, मुंबईतली २६ किलोमीटरची मॅरेथॉन शर्यतही पूर्ण केली होती.
२५ मे इ.स. २०११ रोजी दहा उंटांवर लादलेल्या अत्यावश्यक साहित्य, अन्न आणि पाण्यासह, ती सामील झालेल्या वाळवंट तुडवणाऱ्या सहकाऱ्यांची मोहीम, दक्षिण मंगोलियातल्या खोंगरोसखान या गावातून सुरू झाली. त्यानंतर मात्र, मोहीम संपेपर्यंत म्हणजे १६०० किलोमीटर अंतर पार पाडेपर्यंत या वाळवंटात, ते उंट आणि मोहिमेतला काफिलाच तेवढा चालत होता. रोज पंचवीस किलोमीटरचे, आणि शेवटीशेवटी रोज चाळीस किलोमीटरपर्यंतचे अंतर सुचेता कडेठाणकरला चालावे लागले. असा हा दिनक्रम ५१ दिवस सुरू होता.
संदर्भ
- ^ आठवले, अश्लेशा. "Try Gobi for a change" (English भाषेत). 2012-10-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-08-27 रोजी पाहिले. More than one of author-name-list parameters specified (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
- ^ Athavale, Ashlesha (4 August 2011). "Breaking monotony at Gobi desert" (English भाषेत). 26 August 2011 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)[permanent dead link]
- ^ Ketkar, Swati (26 August 2011). "महिला विशेष - साद देती यशशिखरे". 26 August 2011 रोजी पाहिले.[permanent dead link]