Jump to content

सुग्गी हब्बा

सुग्गी हब्बा हा कर्नाटक राज्यातील सण असून तो उत्तरायणाशी संबंधित आहे.हा दिवस कृषीशी संबंधित आहे असेही मानले जाते.

स्वरूप

कर्नाटक राज्यात संक्रात विशेष भोजन

मकरसंक्रांत सणासारखेच याचे स्वरूप असून कर्नाटक राज्यात या निमित्ताने तीळ, गूळ, खोबरे,भाजलेली हरभरा डाळ, शेंगदाणे यांचे मिश्रण परस्परांना दिले जाते आणि शुभेच्छा दिल्या जातात. नवविवाहित दाम्पत्य आणि तरुण मुली घरोघरी जाऊन तिळगुळाचे हे मिश्रण सर्वाँना देतात आणि आशीर्वाद घेतात. याला 'एल्लू बीरोडू' असे म्हंटले जाते.[] नवविवाहित मुली आपल्या लग्नानंतरची पाच वर्षे; विवाहित सुवासिनी महिलांना केळीचा घड भेट म्हणून देतात. सणासाठी घराची स्वच्छता , आवराआवरी, नवे पोशाख परिधान करणे असेही केले जाते. ग्रामीण भागात गोठ्याताईल गायी, महशी, बैल यांना अंघोळ घालून त्यांची सजावट केली जाते, रांगोळी काढली जाते आणि उत्सवाचा आनंद घेतला जातो.[]

म्हैसूर येथील सजविलेले जनावरे

सार्वजनिक कार्यक्रम

कर्नाटक राज्याच्या सांस्कृतिक विभागाकडून या उत्सवाचे आयाम जगासमोर येण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या सणाविषयी माहिती देणारे उपक्रम आयोजित केले जातात. शेतकरी वर्गाचा आत्मसन्मान वाढविणे हा सुद्धा याचा हेतू आहे.

संदर्भ

  1. ^ "Suggi Habba". Prathi-Prapancha (इंग्रजी भाषेत). 2019-01-15. 2022-01-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-01-09 रोजी पाहिले.
  2. ^ Roy, Nikita. "Makar Sankranti In Karnataka: Date, Significance And Celebration Of Suggi Habba | India.com". www.india.com (इंग्रजी भाषेत). 2022-01-09 रोजी पाहिले.