सुगताकुमारी
सुगताकुमारी | |
---|---|
सुगताकुमारी | |
जन्म | ३ जानेवारी, १९३४ भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
भाषा | मल्याळम |
साहित्य प्रकार | काव्य |
प्रसिद्ध साहित्यकृती | ‘मनालेधुतू’ ‘मुतुचिप्पी’ ‘रातरीमाझा’ ‘अंबालमणी’ ‘दधायेविदे’ |
वडील | बोधेश्वरन |
आई | व्ही.के. कार्तियायिनी |
पुरस्कार | पद्मश्री (इ.स. २००६) साहित्य अकादमी (इ.स. १९७८) |
सुगताकुमारी (३ जानेवारी, इ.स. १९३४ - हयात) या मल्याळम भाषेत काव्यलेखन करणाऱ्या कवियित्री व लेखिका आहेत. त्यांचे आत्तापर्यंत पंधरा कवितासंग्रह व सहा कथासंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना पर्यावरणवादी लेखिका म्हणूनही ओळखले जाते.
जीवन
सुगताकुमारींना सुशिक्षित, सुसंस्कृत आईवडील लाभले. त्यांचे वडील बोधेश्वरन ह्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता. शिवाय ते कवी होते. आई व्ही.के. कार्तियायिनी या संस्कृत विद्वान होत्या. प्राध्यापिका आई आणि कवी असलेले वडील, असेअसल्याने, घरात साहित्यिक चर्चा नित्यनेमाने घडायच्या. त्यामुळे लहानपणीच सुगताकुमारी यांनी कवितालेखनाला सुरुवात केली, पण ती टोपणनावाने. त्यांच्या घरी शिक्षणानिमित्ताने श्रीकुमार नावाचा एक चुलतभाऊ राहत असे. त्याचे नाव धारण करून सुगताकुमारी लिहू लागल्या. त्यांच्या कविता वृत्तपत्रांत छापल्याही जाऊ लागल्या. आपण कविता करतो हे मैत्रिणींना समजले तर त्या आपल्यापासून दूर जातील आणि आपण एकट्या पडू, या भीतीमुळे त्यांनी त्या काळात स्वतःचे खरे नाव प्रकट केले नाही.
कार्य
स्त्रियांच्या मदतीसाठी व विकासासाठी सुगताकुमारी त्यांनी ‘अभयग्राम’ नावाची संस्था स्थापन केली. ‘सायलेंट व्हॅली बचाव’ आंदोलनात त्यांनी नेतृत्व केले होते. केरळ राज्य महिला आयोगाच्या प्रमुखपदीही त्या राहिलेल्या आहेत.[१] ‘तालिरू’ या नियतकालिकाचे संपादनही त्यांनी बराच काळ केले.
पुरस्कार
- के.के. बिर्ला फाउंडेशनचा सरस्वती सन्मान (इ.स. २०१२) - मनालेधुतू (वाळूवरील लेखन) या काव्यसंग्रहासाठी.[२]
- पद्मश्री पुरस्कार (इ.स. २००६)[३]
- साहित्य अकादमी पुरस्कार (इ.स. १९७८) - रातरीमाझा या काव्यसंग्रहासाठी
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Status of women declining: Sugathakumari" (इंग्रजी भाषेत). द हिंदू. ३ नोव्हेंबर, इ.स. २०००. 2002-01-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १ सप्टेंबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले.
|accessdate=, |date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "Saraswati Samman for Sugathakumari" (इंग्रजी भाषेत). 2014-07-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १ सप्टेंबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "A pleasant surprise" (इंग्रजी भाषेत). 2006-09-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १ सप्टेंबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
बाह्य दुवे
- अभय
- ‘तालिरू’ नियतकालिक
- Sugathakumari excerpts from an Interview Archived 2016-03-04 at the Wayback Machine.