सुखोई एसयू-३० एमकेआय
सुखोई एसयू-३० एमकेआय | |
---|---|
सुखोई एसयू-३० एमकेआय विमान | |
प्रकार | लढाऊ विमान |
उत्पादक देश | रशिया/भारत |
उत्पादक | हिंदुस्तान एअरोनॉटीक्स लिमिटेड सुखोई च्या परवान्याखाली |
रचनाकार | सुखोई डिझाईन ब्युरो |
पहिले उड्डाण | २००० |
समावेश | २७ सप्टेंबर २००२ |
सद्यस्थिती | भारतीय वायुसेना |
मुख्य उपभोक्ता | भारत |
उत्पादन काळ | २००० - आता |
उत्पादित संख्या | २३० (फेब्रुवारी २०१७ पर्यंत)[१] |
प्रति एककी किंमत | ₹३५८ कोटी रुपये (२०१४ मध्ये)[२] |
मूळ प्रकार | सुखोई एसयू - ३० |
सुखोई एसयू-३० एमकेआय हे भारतीय वायुसेनेतील एक बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे. रशियाच्या सुखोई आणि भारताच्या हिंदुस्तान एअरोनॉटीक्स लिमिटेड ने याची निर्मिती भारतीय वायुसेने करिता केली आहे. हे विमान सुखोई एसयू - ३० या विमानाची सुधारित अवृत्ती आहे.
सुखोई एसयू-३० एमकेआयची वैशिष्ट्ये
- चालक दल : २
- लांबी : २१.९३५ मी (७२.९७ फुट)
- पंखांची लांबी : १४.७ मीटर (४८.२ फुट)
- उंची : ६.३६ मी (२०.८५ फुट)
- पंखांचे क्षेत्रफ़ळ : ६२.० चौरस मी (६६७ चौरस फुट)
- निव्वळ वजन : १८,४०० कि.ग्रॅ.
- सर्व भारासहित वजन : २६,०९० कि.ग्रॅ.
- कमाल वजन क्षमता : ३८,८०० किलो
- इंधन क्षमता : ३,२०० किलो
- कमाल वेगः
- कमी उंचीवर : माख १.२ (१,३५० किमी/तास)
- अति उंचीवर : माख २ (२,१०० किमी/तास)
- कमी उंचीवर : माख १.२ (१,३५० किमी/तास)
- पल्ला : ३,००० किमी
- बंदुक : ३० मिमी
- उडताना समुद्रसपाटीपासुन कमाल उंची : १७,३०० मी
हेही पाहा
- तेजस
- मरुत
- जग्वार
- मिराज
- मिग-२१
- युरोफायटर टायफून
- चेंग्दु थंडर
- भारतीय वायुसेना
- ^ नेक्रासोव मिखाईल. "इर्कुट कॉर्पोरेशन भारताला ४० सु-३०एमकेआय देणार" (इंग्रजी भाषेत). 2017-03-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-02-13 रोजी पाहिले.
- ^ अजय शुक्ला. "रफाल इन स्टॉर्म क्लाऊड्स, पर्रिकर सेय्स् आयएएफ कॅन मेक डू विथ सुखोई-३०". 31 December 2014 रोजी पाहिले.