सुखदेव थोरात
सुखदेव थोरात | |
पुणे येथील सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठामध्ये बोलताना थोरात | |
जन्म | १२ जुलै, १९४९ महिमपूर, अमरावती, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
धर्म | बौद्ध धर्म |
कार्यक्षेत्र | अर्थशास्त्र |
कार्यसंस्था | विद्यापीठ अनुदान आयोग |
प्रशिक्षण | जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली, (पीएच.डी.) |
पुरस्कार | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार (२०१९) डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार (२०११) राजीव गांधी आऊटस्टँडींग लिडरशीप राष्ट्रीय पुरस्कार (२०१४)
|
सुखदेव थोरात ( १२ जुलै १९४९) भारतीय अर्थशास्त्रज्ञ आहेत. ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष व दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर द स्टडी ऑफ रीजनल डेव्हलपमेंट’चे माजी प्राध्यापक (प्रोफेसर इमेरिटस) आहेत.[१]
शिक्षण
थोरातांनी औरंगाबादच्या मिलिंद कॉलेज ऑफ आर्ट्स येथून बी.ए., डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात एम.ए., जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून एम.फिल/ पीएचडी व वॉर्सा (पोलंड) मधील मेन स्कूल प्लॅनिंग येथून आर्थिक नियोजन विषयात पदविका प्राप्त केली आहे.
पुरस्कार
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार (२०१९), मारवाडी फाऊंडेशन, नागपूर[२]
- डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार (२०११), भारत सरकार
- राजीव गांधी आऊटस्टँडिंग लीडरशीप राष्ट्रीय पुरस्कार (२०१४)
- पद्मश्री पुरस्कार (२००८)
- विद्यालंकार (२००८)
- पी.के. पाटील पुरुषोत्तम पुरस्कार (२००७)
- भारत शिरोमणी (२००६)
- आंबेडकर चेतना पुरस्कार (२००१)[३]
संदर्भ
- ^ "What upper castes owe".
- ^ https://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/ambedkar-award-recognition-of-social-work-says-thorat/articleshow/67388955.cms
- ^ "Prof. Sukhadeo Thorat". The World Bank. 13 February 2014 रोजी पाहिले.