Jump to content

सुई कला

सुईचा वापर करून केलेली कलाकुसर ही सुई कला (इंग्लिश: NeedleArt) वर्गामधे मोडते. शिवणकाम, क्रोशे, दोन सुयांवरील विणकाम, भरतकाम, क्रॉस स्टिच, फेल्टिंग यासारख्या कलाकुसरींसाठी सुई वापरली जाते. सुईला असलेल्या भोकामधून दोरा किंवा लड ओवून अथवा सुईला आकड्याप्रमाणे वापरून अशी कलाकुसर केली जाते.

कलाकुसरीसाठी वापरलेले सुईचे प्रकार निरनिराळे असू शकतात. उदाहरणार्थ, शिवणकलेमधे हाताने शिवणकाम करताना सुईच्या नेढ्याला भोक असते, मात्र यंत्रावरील शिवणकलेसाठी सुई वापरताना सुईच्या अग्राजवळ भोक असावे लागते. तर क्रोशे विणकामामधे सुईला भोकाऐवजी अग्राजवळ आकड्यासारखा वक्र भाग असतो. दोन सुयांवरील विणकामामधे सुईला कुठेही भोक नसते, दोन सरळसोट लांब सु्या वापरल्या जातात.