सुंदा सामुद्रधुनी
सुंदा सामुद्रधुनी (इंडोनेशियन: सेलाट सुन्दा) ही जावा आणि सुमात्रा या इंडोनेशियन बेटांमध्ये आहे. ही सामुद्रधुनी जावा सागराला हिंद महासागरशी जोडते. इंडोनेशियाच्या प्सुंदन शब्दापासून हा शब्द आला आहे. या शब्दाचा अर्थ "पश्चिम जावा" असा आहे. हा शब्द सुंदानी लोकांच्या नावावरूनही घेतला आहे. सुंदानी हे जावाच्या पश्चिम भागातील मूळ लोक आहेत. [१]
भौगोलिक स्थिती
ही सामुद्रधुनी उत्तर-पूर्व ते दक्षिण-पश्चिम अशी पसरलेली आहे. सुमात्रावरील केप तुआ आणि जावावरील केप पुजात दरम्यान उत्तर-पूर्वेकडे ही किमान २४ किमी (१५ मैल) रुंद आहे. पश्चिमेकडील भागात ती खूप खोल आहे. पूर्वेकडे ती अरुंद आणि उथळ होत जाते, पूर्वेकडील काही भागांमध्ये ती फक्त २० मीटर (६५ फूट) खोल आहे. यामुळे समुद्रकिनाऱ्यावरील वाहतूक फार् जोखमीची होते. या ठीकाणी जबरदस्त प्रवाह आहे आणि जावा किनाऱ्यावरील तेल प्लॅटफॉर्म सारख्या मानव-निर्मित अडथळ्यांमुळे येथे संचार करणे अवघड आहे. शतकानुशतके ही सामुद्रधुनी एक महत्त्वाचा जलमार्ग होता, खासकरून डच ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात हा मार्ग इंडोनेशियाच्या स्पाइस बेटांकडे (१६०२ - १७९९) जाण्यासाठीचा गेटवे म्हणून वापरला जात असे. परंतु सामुद्रधुनीची अरुंदता, उथळपणा आणि अचूक चार्टिंगची कमतरता यामुळे बऱ्याच आधुनिक मोठ्या जहाजांसाठी ही उपयुक्त नाही, यांमुळे बहुतेक जहाजे मलाकाची सामुद्रधुनी वापरतात. [२]