सीरियल एक्सपेरिमेन्ट्स लेन
सीरियल एक्सपेरिमेन्ट्स लेन | |
---|---|
{{{चित्रशीर्षक}}} | |
दूरचित्रवाहिनी | तोक्यो दूरचित्रवाणी |
भाषा | जपानी |
प्रकार | अॅनिमेशन फिल्म |
देश | जपान |
निर्माता | यासुयुकी उएदा |
दिग्दर्शक | ऱ्युतारो नाकामुराने |
निर्मिती संस्था | ट्रँगल स्टाफ |
लेखक | चिआकी जे. कोनाका |
कलाकार | लेन इवाकुरा (काल्पनिक पात्र) |
शीर्षकगीत/संगीत माहिती | |
शीर्षकगीत | "डुवेट" |
शीर्षकगीत गायक | बोआची जॅस्मीन रॉजर्स |
अंतिम संगीत | "तोओइ साकेबी" |
प्रसारण माहिती | |
पहिला भाग | जुलै १९९८ |
अंतिम भाग | सप्टेंबर १९९८ |
एकूण भाग | १३ |
वर्ष संख्या | १९९८, जुलै ते सप्टेंबर |
बाह्य दुवे | |
संकेतस्थळ |
सीरियल एक्सपेरिमेन्ट्स् लेन ही ऱ्युतारो नाकामुराने दिग्दर्शित केलेली दूरचित्रवाणीवरची एक ॲनिमे मालिका आहे, मालिकेची मूळ पात्ररचना योशितोशी आबे ह्यांनी, लेखन चिआकी जे. कोनाका ह्यांनी व निर्मिती, ट्रँगल स्टाफसाठी यासुयुकी उएदा ह्यांनी केली. ही तोक्यो दूरचित्रवाणीवर १९९८ साली, जुलै ते सप्टेंबर या महिन्यांत दाखवली गेली होती. त्याच नावाने १९९८ साली नोव्हेंबरमध्ये पायोनियर एलडीसी यांचा संगणकावर खेळायचा एक प्ले-स्टेशन गेमसुद्धा बाजारात आला.
लेन ही वास्तविकता, व्यक्तिमत्त्व व संचार या सारख्या तत्त्वज्ञानविषयांचा प्रभाव असलेली आवांत-गार्ड[सोप्या शब्दात लिहा] अॅनिमे मालिका आहे.[१] जपानच्या उपनगरात राहणारी तारुण्यावस्थेत प्रवेश करणारी लेन इवाकुरा या धारावाहिकेच्या केंद्रस्थानी आहे. ही मुलगी वायरड नावाच्या इंटरनेटसारख्या एका जागतिक संगणक नेटवर्कला भेट देते. लेन ही एक मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी आहे. तिच्या बहिणीचे नाव मिका. त्यांची भावनाशून्य आई व त्यांचे संगणकाने पछाडलेले वडील असे हे कुटुंब आहे. जेव्हा लेनला समजते की तिच्या शाळेतल्या मुलींना चीसा योमोदाकडून एक ई-मेल आला आहे, तेव्हा लेनच्या एकाकी आयुष्याच्या तलावावर पहिला तरंग उठतो. ही चीसा योमेदा लेनची शाळासोबती होती आणि तिने आत्महत्या केलेली होती. लेनला हा संदेश आपल्या घरीच मिळतो. चीसा मेलेली नसून फक्त "मांसापासून मुक्त झाली आहे" व तिला वायरडमध्ये देव सापडला आहे असा तो संदेश असतो. त्यानंतर नेटवर्क व आपल्या विचारांमध्ये आणखीनच खोल जाणाऱ्या एका मार्गावर लेन धावत सुटते, असे एकंदरीत कथानक आहे.
उत्तर अमेरिकेत या धारावाहिकेचे डीव्हीडी, व्हीएच्एस व लेझरडिस्कसाठी प्रदर्शनाचे हक्क जेनिऑनकडून दिले गेले होते. परंतु, जेनिऑनने २००७ सालच्या डिसेंबरमध्ये आपले यूएस्ए वर्ग बंद केले व त्यामुळे ही धारावाहिक अनुपलब्ध झाली.[२] परंतु, अॅनिमे एक्सपो २०१० मध्ये उत्तर अमेरिकी डिस्ट्रिब्यूटर फनिमेशन एंटरटेन्मेन्टने जाहीर केले की त्यांना मालिकेचे हक्क मिळाले आहेत आणि ती २०११ मध्ये पुन्हा उपलब्ध केली जाईल.[३] सिंगापूरमध्ये ही मालिका ओडेक्सद्वारा उपलब्ध झाली. मात्र, फक्त विषय व नायिका समान असणारा व्हिडियो गेम फक्त जपानमध्येच मिळतो.
धारावाहिकेत तत्त्वज्ञान, संगणकाचा इतिहास, सायबरपंक वाङमय व षड्यंत्राचे सिद्धान्त यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. हा धारावाहिका अनेक शैक्षणिक विषय हाताळते. इंग्रजी भाषेतील अॅनिमे समीक्षकांना ही "विचित्र" व पारलौकिक वाटून त्यांनी तिला एकजात होकारार्थी प्रतिक्रिया दिल्या. निर्माता उएदाला वाटले होते की जपानी व अमेरिकी प्रेक्षक एकमेकांच्या विरोधी प्रतिक्रिया देतील; पण या बाबतीत तो निराश झाला. कारण, सर्वच समीक्षा एकसारख्या निघाल्या.
गोष्ट
सीरियल एक्सपेरिमेन्ट्स लेनमध्ये "वायरड" हे तारा व दूरध्वनी सेवांनी निर्माण करून इंटरनेट व त्यानंतरच्या नेटवर्कद्वारे पसरवल्या गेलेल्या मानवी संचाराची गोळाबेरीज आहे अशी कल्पना केली आहे. हे वायरड एका अशा तंत्राशी जुळवू शकते की तेथे प्रत्यक्ष जोडणी नसूनही मनु्ष्याच्या नकळत त्याच्यात व यंत्रांमध्ये विनिमय कार्यान्वयित होतो.(शूमन अनुनाद. जी तत्त्वतः दूर अंतरापर्यंत खुला संचार होऊ देते, अशी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राची एक संपत्ती आहे. असे तंत्र जर एक विशिष्ट जोडणीने साधता आले तर ते नेटवर्क सर्वबोधी व ज्ञानाची सार्वजनिक वास्तविकता म्हणून अस्तित्वात येईल. तसे झाले तर, खरे काय व शक्य काय ह्यातली बारीक सीमारेषा अंधुक होण्यास सुरुवात होईल.
मालिकेच्या timeframe[मराठी शब्द सुचवा] मधील पुढच्या पिढीचे इंटरनेट प्रोटोकॉल, प्रोटोकॉल ७, ह्याचे प्रकल्प दिग्दर्शक म्हणजे एइरी मासामी, जो ताचीबाना प्रयोगशाळा नावाच्या प्रसिद्ध संगणक कंपनीसाठी काम करत असतो. वरील वर्णन केलेल्या बिनतारी तंत्राच्या द्वारे, मासामीने स्वतःच्या निर्मितीचे कोड घालून स्वतःला वायर्ड वर नियंत्रण दिले आहे. त्याने मग स्वतःची चेतना[मराठी शब्द सुचवा] वायर्डमध्ये "अपलोड" करून असतीत्वात थोड्याच दिवसांनंतर मरण पावतो. हे सर्व मालिकेच्या मध्यमार्ग प्रदर्शित केले जाते, पण या ठिकाणी सीरियल एक्सपेरिमेन्ट्स लेनची गोष्ट सुरू होते. त्यानंतर मासामी लेनला समझावतो की ती एक artifact[मराठी शब्द सुचवा] आहे, ज्याच्या मदतीने आभासी व भौतिक जगांच्या मधली भिंत कोसळणार आहे. ही योजना संपादित करण्यासाठी, लेनला वायर्डमध्ये आणून त्याच्यासारखेच "मांसापासून मुक्ती मिळवणे" गरजेचे असते. बिनशर्त प्रेमचे वचन देऊन, मोहकतेने व नशीबाने तो लेनच्या वाटेत पडून तिला पटवण्याचा प्रयत्न करतो. सर्व अपयश ठरल्यानंतर, तो धमकी व बलाचा वापर करू लागतो.
याच वेळी, "पौर्वात्य कलनेचे सरदार" व ताचीबाना प्रयोगशाळा यांमधील लपंडावाचा एक गुंतागुंतीचा खेळ चालू असतो. "पौर्वात्य कलनेचे सरदार" हे हॅकर असतात, जे मासामीच्या मते "विश्वास ठेवणारे व्यक्ती जे त्याला वायर्ड मध्ये देव म्हणून समर्थीत करतात". ताचीबाना प्रयोगशाळा त्यांच्याशी लढून प्रोटोकॉल ७ला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत असतात. शेवटी, अत्यंत आत्मनिरीक्षण केल्यानंतर लेनला हे कळते की तिच्याकढे सर्वांच्या मनांवर व वास्तविकतेवरही तिची संपूर्ण सत्ता आहे. स्वतःच्या विविध आवृत्तींशी संवादामधून हे दर्शावले जाते की तिला भौतिक जगापासून दुर्लक्ष झाल्यासारखे वाटते, व वायर्डमध्ये तिच्याकढे एका देवीची संभावना व जबाबदारी असण्यामुळे तिथे राहण्याशी सुद्धा घाबरते. शेवटच्या रंगदृश्यांमध्ये ती सर्वांच्या स्मृतिंपासून स्वतःशी जोडलेले सगळे काही नष्ट करते. शेवटी ती अपरिवर्तित अशी दिसते व तिची जुनी मैत्रीण ॲलिसला भेटते, जिचे अता लग्न झाले आहे. लेन स्वतःला वचन देते की ती ॲलिसची काळजी घेईल.
पात्र
- लेन इवाकुरा (岩倉 玲音 इवाकुरा रेइन )
- आवाज: काओरी शिमिजू
- लेन, जी मुख्य पात्र आहे, एक १४ वर्शांची मुलगी असते जी मालिकेत स्वतःचा खरा स्वरूप प्रकट करते. सुरुवातीला, कमी मित्र व छंद ठेवणारी एक लाजाळू विद्यार्थी म्हणून चित्रित केली आहे. नंतर भौतिक व वायर्ड जगांमध्ये तीच्यात अनेक, जास्त धाडसी व्यक्तिमत्त्वांचा विकास होऊ लागतो.
- मासामी एइरी (英利 政美 एइरी मासामी )
- आवाज: शो हायामी
- प्रोटोकॉल ७चा मुख्य संकल्पक. ताचीबाना प्रयोगशाळेसाठी काम करत असताना, त्याने त्यात विधिनिषिद्धपणे अशे कोड घातले ज्याने त्याला संपूर्ण प्रोटोकॉलवर त्याचेच हवेतसे नियंत्रण राहील, व स्वतःची चेतना त्या प्रोटोकॉलमध्ये अंतःस्थापीत केली. त्यामुळे त्याला ताचीबाना प्रयोगशाळेमधून बाहेर टाकले गेले व तो एका रेल्वेमार्गावर मेलेला सापडला. त्याचा असा विश्वास असतो की मानवांसाठी पुढे विकसित होण्यासाठी भौतिक मर्यादांपासून मुक्त होऊन, अंकीय अस्तित्व म्हणून जगणे आवश्यक आहे.
- यासुओ इवाकुरा (岩倉 康男 इवाकुरा यासुओ )
- आवाज: ऱ्यूसुके ओउबायाशी
- संगणक व इलेक्ट्रॉनी संचाराबद्दल अतिउत्साहीत असून तो ताचीबाना प्रयोगशाळेत एइरी मासामीबरोबर काम करताना दर्शावला आहे. लेनचा पिता असुन तो तिला वायर्ड प्रस्तूत करतो, व ती आपल्या परिस्थितीबाबतीत सावध होण्यापर्यंत तिच्या विकासावर लक्ष ठेवतो. तिला सोडताना तो तिला सांगतो की कुटुंबात भूमिका करण्यात आनंद वाटला नाही, पण तिच्यावर त्योचे प्रेम होते. लेनला वायर्डकढे आकर्षित करण्यात तो उत्सुक्तीत वाटतो, पण तिला ही चेतावनी देतो की तिने त्यात स्वतःला अतीगुंतणे योग्य नाही.
- मिहो इवाकुरा (岩倉 ミホ )
- आवाज: रेइ इगाराशी
- लेनची आई, जी एक गृहिणी असते. ती सतत मिकाचे लाड करते, पण लेनशी उदासीनपणे वागते. नवऱ्यासारखेच, ती लेनला सोडून जाते, व ती खरोखरी कुटुंबाची भाग न्हवतीच.
- ॲलीस मिजूकी (瑞城 ありす मिजूकी आरीसु )
- आवाज: योको आसादा
- लेनची वर्गसोबती व पूर्ण मालिकेत तिची एकमेव मैत्रीण. ॲलीस सरळ व प्रामाणिक व्यक्तिमत्त्वाची एक निष्ठावंत confidante[मराठी शब्द सुचवा] असते. लेनला लोकांमध्ये मिसळण्याकरीता तिला एका नाईटक्लबमध्ये न्हेते, जिथून ती नेहमी लेनचे संरक्षण करण्याचे व काळजी घेण्याचे प्रयत्न करते. आपल्या विद्यालयातील त्रिकूटमध्ये ॲलीस ही सर्वात लाजाळू सदस्य म्हणून चित्रित केली जाते, पण तिच्या पात्राच्या विकासात आपल्या मित्रांसाठी एक निर्भय समर्पण दिसून येते. ॲलीस व तिच्या दोन मैत्रीणी जुरी आणि रेइका ह्याना चिआकी कोनाकाने आपल्या आधल्या कृत्य "साय्बरलँडमध्ये ॲलीस" यातून घेतले.[४]
- मिका इवाकुरा (岩倉 美香 इवाकुरा मिका )
- आवाज: आयाको कावासुमी
- लेनची मोठी बहीण, एक १६ वर्शांची भावहीन विद्यार्थी जी आपल्या लहान बहीणीच्या सवयी व प्रवृत्तिवर सहज टीका करत असते. ती आपल्या प्रियकरला लव हॉटेलमध्ये भेटते, पथ्यावर असते व तोक्यो मध्ये शिबुयाला खरेदी करते. मालिकेत एका जागी जबरदस्त संवेदनभ्रमांमुळे तिची चेतनेला गंभीरपणे हानि पोचते. जंव्हा लेन मोकळ्यापणाने वायर्ड मध्ये बुडी मारू लागते, तेंव्हा लेनच्या जवळची असल्यामुळे ती सुद्धा वायर्डमध्ये न्हेली जाते, आणि ती भौतिक जग व वायर्ड या दोघानच्या मध्ये अडकून जाते.[५]
- तारोउ (タロウ तारोउ )
- आवाज: केइतो ताकिमोतो
- लेनच्या वयाचा एक तरुण मुलगा, जो कधी-कधी सरदारांसाठी काम करून "एकमेव सत्य" आणण्याचा प्रयत्न करतो. त्याला अजून पर्यन्त सदस्य बनवलेले नाही, व त्याला सरदारांच्या खऱ्या हेतुंची खात्री नाही. तारोउला आभासी वास्तवतेचे संगणक खेळ आवडतात व पूर्ण दिवस आपले मित्र म्यु-म्यु आणि मासायुकी बरोबर सायबेरिया नाइटक्लबमध्ये घालवतो. तो खास सानुकूल हॅन्डीनॅवी व दृश्य-गॉगलसार्ख्या तंत्रांचे वापर करतो. तारोउ इंटरनेटवर आपल्या अनामिकतेवर गर्व ठेवतो,[६], आणि तो माहितीच्या बदली लेनच्या वायर्ड आवृत्तीशी डेटची मागणी करतो.
- "कार्यालय कर्मचारी"
- आवाज: शिगेरु चिबा
- स्वतःची कार्यसूची ठेवणारा ताचीबाना प्रयोगशाळेचा एक उच्च कार्यकारी, जो आपले काम मेन इन ब्लॅक द्वारे करतो. वायर्डमधून एका खऱ्या देवाच आगमनाची वाट पाहतो, व सरदारांच्या प्रचंड हत्येपाठी त्याचा हात असतो. लेनबद्दल अनेक गुप्त तथ्य त्याला माहीत असतात, पण उत्तर देण्याजागी प्रश्ण विचारण्याची त्याची प्रवृत्ति असते.
- मेन इन ब्लॅक
- कार्ल हाउसहोफर (カール・ハウスホーファー हाउसुहो-फा- का-रु ), आवाज: ताकुमी यामाजाकी
- लिन सुइ-षी (林 随錫 तिआन सुइ लिन ), आवाज: जोउजी नाकाता
- दोघेही सर्व सरदारांना शोधून मारून टाकण्यास वरील "कार्यालय कर्मचारी"साठी काम करतात. त्यांना खरी योजना सांगितली जात नाही, पण एइरी मासामी गुंतवलेला आहे एवढे त्यांना माहीत असते. त्यांना "वायर्ड देवाची गरज नाही आहे" असे ते व्यक्त करतात.[७]
संदर्भ व टिपा
- ^ नेपिअयर, सुसान जे. "व्हेन द मशिन्स स्टॉप: फँटसी, रिअॅलिटी अँड टर्मिनल आयडेंटिटी इन निऑन जेनेसिस इव्हँजेलियन अँड सीरियल एक्सपेरिमेंट्स लेन". सायन्स फिक्शन स्टडीज. २९ (८८): ४१८-४३५. आय.एस.एस.एन. ००९१७७२९. ४ मे, इ.स. २००७ रोजी पाहिले.
|accessdate=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "गिनिऑन यूएस्ए टू कॅन्सल डीव्हीडी सेल्स, डिस्ट्रिब्यूशन बाय फ्रायडे". ३० जानेवारी, इ.स. २०१० रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "फनी अॅड्स लाइव्ह अॅक्शन मोयाशिमॉन लाइव्ह मोर". ३ जुलै, इ.स. २०१० रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ चुका उधृत करा:
<ref>
चुकीचा कोड;एचके
नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही - ^ "यासुयुकी उएदा व योशीतोशी आबे बरोबर ओटाकॉन मंडळ चर्चा". सप्टेंबर १६, २००६ रोजी पाहिले.
- ^ तारोउ: "मजा ही काय आणि ती माझ्यासाठी मजा का, हे कुणालाही माहीत नाही" सीरियल एक्सपेरिमेन्ट्स लेन, लेयर ०८, "अफवा".
- ^ कार्ल: "आम्हाला देवाची गरज नाही." लिन: "वायर्ड मध्ये सुद्धा आणि वास्तवात मध्येही सुद्धा." सीरियल एक्सपेरिमेन्ट्स लेन, लेयर १०, "प्रेम".
श्