सीरध्वज जनक
सीरध्वज जनक (संस्कृत: सीरध्वज जनक ; ख्मेर: जनक ; तमिळ: ஜனகன், चनकन् ; थाई: चोनोक ; भासा मलायू: Maharisi Kala, महरिसी काला;) हा रामायणात उल्लेखलेला विदेह देशाचा जनक कुळातील राजा होता. तो सीतेचा पिता व रामाचा सासरा होता [१].
जनक कुळातील ऱ्हस्वरोमन् राजाच्या दोन पुत्रांपैकी सीरध्वज थोरला पुत्र होता. सीरध्वजाला कुशध्वज नावाचा धाकटा भाऊ होता. सीरध्वज निपुत्रिक असल्यामुळे त्याच्यामागून कुशध्वज विदेहाचा राजा बनला[१].
परिवार
सीरध्वजास सीता व उर्मिला नावाच्या दोन कन्या होत्या. त्या दोघींचा विवाह अनुक्रमे राम व लक्ष्मण यांच्याशी झाला.