Jump to content

सीमा गोखले


सीमा सुधाकर गोखले (माहेरच्या सीमा गोविंद जोगळेकर) या एक मराठी लेखिका आहेत. त्यांचा जन्म बनारसचा, बालपण तेथेच गेले. बनारसमध्ये जोगळेकरांचा मोठा वाडा होता. वडील वकील होते.

सीमा जोगळेकर शिक्षणासाठी महाराष्ट्रात आल्या. त्यांनी प्रारंभी शाळा-काॅलेजाच्या मासिकांतून लिखाण केले. त्या बी.ए. डीएड. आहेत. शाळेत नोकरी करत असताना त्यांनी त्यांची साहित्याची आवडही जोपासली. काव्यतरंग, शब्दवैभव, काव्यचित्र प्रदर्शन इत्यादी कविसंमेलनात त्यांचा सहभाग होता. सीमा गोखले यांना विदर्भातील साहित्यिक डाॅ. अ.ना. देशपांडे आणि वसंत वऱ्हाडपांडे या गुरुवर्यांचे शिष्यत्व लाभले. पुण्यात आल्यावर डाॅ. शंतनू चिंधडे यांचे मार्गदर्शन मिळले

सीमा गोखले यांनी लिहिलेली पुस्तके

  • अक्षरधन (ललित)
  • ओंजळभर ज्ञानरत्ने
  • केल्याने देशाटन भाग १, २. (याच नावाची पुस्तके चंद्रशेखर टिळक आणि अभिमन्यू सूर्यवंशी यांनी लिहिली आहेत).
  • गोफ (कविता व भक्तिरचना संग्रह)
  • चंद्रझुला (कवितासंगर्ह)
  • निर्धर (कादंबरी)
  • भक्तीचे चतुरंग (संतचरित्रे)
  • रामायणातील स्त्रीपात्रे
  • श्री माउलींंनी ज्ञानेश्वरीत दिलेली रोजच्या जीवनातील सहज सोपी उदाहरणे