Jump to content

सीतामढी जिल्हा

सीतामढी जिल्ह्याचे नकाशावरील स्थान

सीतामढी जिल्हा
बिहार राज्यातील जिल्हा
सीतामढी जिल्हा चे स्थान
सीतामढी जिल्हा चे स्थान
बिहार मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यबिहार
मुख्यालयसीतामढी
क्षेत्रफळ
 - एकूण २,२९४ चौरस किमी (८८६ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ३४,२३,५७४ (२०११)
-लोकसंख्या घनता१,५०० प्रति चौरस किमी (३,९०० /चौ. मैल)
-साक्षरता दर५२%
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघसीतामढी
-खासदारसुनील कुमार पिंटू
संकेतस्थळ


सीतामढी येथील जानकी कुंड

सीतामढी जिल्हा हा बिहारच्या ३८ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. १९७२ साली शेजारील मुझफ्फरपूर जिल्ह्याचे विभाजन करून हा जिल्हा निर्माण करण्यात आला. सीतामढी जिल्हा बिहारच्या उत्तर भागात भारत-नेपाळच्या सीमेलगत वसला असून सीतामढी येथे त्याचे मुख्यालय आहे. रामायणामधील सीतेचा जन्म ह्या स्थळी झाला असे मानण्यात येते.

२०११ साली सीतामढी जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ३४ लाख होती. बज्जिका ही मैथिलीची एक बोली ह्या भागात वापरली जाते. सीतामढी हा भारतामधील सर्वात अविकसित २५० जिल्ह्यांपैकी एक असून ह्या जिल्ह्याला केंद्र सरकारकडून मदत मिळत आहे.

बाह्य दुवे