सीइंग लाइक अ फेमिनिस्ट
सीइंग लाईक अ फेमिनिस्ट
हे निवेदिता मेनन यांचे पुस्तक २०१२ मध्ये झुबाण-पेन्गुईन या प्रकाशनाने दिल्ली येथून प्रकाशित केले आहे.[१] ह्या पुस्तकात लेखिकेने स्त्रीवादी राजकारण आणि समाजातील सत्तेच्या लिंगभावात्मक साधनांवर एक स्त्रीवादी दृष्टिकोन टाकला आहे. ‘सीइंग लाईक अ फेमिनिस्ट’ हे शीर्षक लेखिकेला जेम्स स्कॉट यांच्या ‘सीइंग लाईक अ स्टेट’ ह्या पुस्तकावरून सुचले आहे.[२] प्रस्तुत पुस्तकात लेखिका ह्या स्वतःच्या स्त्रीवादी राजकारणातून आणि स्त्रीवादी परिप्रेक्ष्यातून जगातील विविध भागांमधील स्त्रीवादी वादविवाद आणि अनुभवांकडे बघण्याचा प्रयत्न करत आहेत. हे पुस्तक सहा विविध भागांमध्ये विभाजित केलेले आहे. हे सर्व भाग परस्परसंबंधित आहेत.[३]
कुटुंब
जेव्हा जेव्हा सामाजाने ठरवून दिलेल्या कायदे मुली किव्वा स्त्रिया तोडतात तेव्हा कुटुंब व्यवस्था ही कश्या पद्धतीने एकूणच स्त्रीची लैगिकता आणि पितृसात्तेचे वाहक म्हणून स्त्रियांचे प्रेम, श्रम आणि एकूण जगणे मर्यादित करतात. प्रस्तुत पुस्तकात मोनीची कथा आहे ज्यात काही दिवसापूर्वी पश्चिमबंगाल मधील एका गावात मोनी नावाच्या मुलीला “मुलासारखे वागल्यामुळे” आणि मुलाचे कपडे घातल्यामुळे खूप मारझोड करून, सार्वजनिक नग्न केले गेले. ह्या कथेतून लेखिकेला मुलींवर होणाऱ्या लैगिक अत्याचाराबाद्दल सांगायचे आहे आणि त्याचबरोबर ह्या लैगिक हिंसेमागे कोण कोणत्या गोष्टी कार्यरत असतात ह्याचे विश्लेषण केलेले आहे. विवाह संस्थेत विवाह हे दोन भिन्नलिंगी व्यक्तीनी एकत्र येऊन पुनरुत्पादनाच्या उद्देश्याने केले जातात पण मोनीच्या बाबतीत तसेना होण्याची भीती होती. कारण दोन स्त्रियांनी केलेले प्रेम आणि जाती, धर्मा बाहेर केलेले प्रेम हे विवाह संस्थेला त्याचबरोबर एकूण पितृसत्ताक रचनेला एक मोठा धोका असतो. आणि असे धोके टाळण्यासाठी हिंसेचा वापर केला जातो.[४]
शरीर
इच्छा
लैगिक हिंसाचार
स्त्रीवादी आणि ‘स्त्री’
बळी आणि वाहक
संदर्भ सूची
- ^ "Nivedita Menon's Path-Breaking Book Reveals The Complex Layers Of Feminism". Youth Ki Awaaz (इंग्रजी भाषेत). 2018-12-09 रोजी पाहिले.
- ^ Menon, Nivedita (2012-12-01). Seeing Like a Feminist (इंग्रजी भाषेत). Penguin UK. ISBN 9788184757705.
- ^ s; April 27, hya-; Pm, 2013 at 7:40. "Book review of Nivedita Menon's Seeing Like A Feminist". Women's Web: For Women Who Do (इंग्रजी भाषेत). 2018-12-09 रोजी पाहिले.
- ^ "Training the eye". The Hindu (इंग्रजी भाषेत). 2013-02-14. ISSN 0971-751X. 2018-12-09 रोजी पाहिले.