सी.बी.डी. बेलापूर
बेलापूर (अहमदनगर) याच्याशी गल्लत करु नका.
सी.बी.डी. बेलापूर
सी.बी.डी. बेलापूर हा नवी मुंबई शहराचा एक नोड आहे. नवी मुंबईच्या इतर नोडप्रमाणे हा नोड देखील सिडकोने विकसित केला आहे. सी.बी.डी. बेलापूर भागात अनेक कंपन्यांची कार्यालये, सिडकोचे मुख्यालय सिडको भवन, तसेच कोकण भवन, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इत्यादी अनेक महत्त्वाची सरकारी कार्यालये स्थित आहेत.
सी.बी.डी. बेलापूर रेल्वे स्थानक हे मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य रेल्वे (हार्बर) उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे.