सिल्लोड
?सिल्लोड महाराष्ट्र • भारत | |
— शहर — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची | • ६१२ मी |
जिल्हा | छत्रपती संभाजीनगर जिल्हा |
लोकसंख्या साक्षरता • पुरूष • स्त्री | २,९१,०५६.०० (2001) ६५ % • ७३ % • ५६ % |
सिल्लोड भारताच्या महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असून सिल्लोड तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. सिल्लोड तालुक्यामध्ये वरुड, गोळेगांव, बोजगाव, गेवराई शेमी, निल्लोड, अजिंठा, शिवना, अंधारी, पळशी, भराडी, वडोद चाथा,आमठाणा मंगरूळ, चांदापूर, चिंचपूर, हट्टी, बहुली, पिरोळ, पालोद, अंभई, देऊळगाव बाजार, हळदा, चारनेर, उंडणगांव, (वडाचे) टाकळी खुर्द इत्यादी खेडी आहेत. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी याच तालुक्यात आहेत.
अंधारी हे गाव सिल्लोड तालुक्यातील मोठे आणि म्हत्वाचे गाव आहे,येथे कृषी उत्पन्न बाजार समिती असून हे गाव, सिल्लोड - कन्नड, सिल्लोड - फुलंब्री आणि कन्नड - फुलंब्री तालुक्याचा सीमेवर असलेले तालुक्यातील आर्थिक आणि राजनीतिक दृष्ट्या मोठे गाव आहे. गावात रोज सकाळी सकाळी घंटा गाडी कचरा गोळा करायला येते.
सिल्लोड शहरात म्हसोबा महाराजांचे जागृत देवस्थान आहे. दरवर्षी म्हसोबा महाराजांचे जत्रा भरत असते. जत्रेच्या निमित्ताने तिथे जत्रेत रहाटपाळणे, विक्रीसाठी विवध वस्तू असतात. या निमित्ताने बोललेले नवस फेडले जातात.
सिल्लोड तालुक्याचे मुख्य पीक मका, मिरची व कापूस आहे. सिल्लोड शहरामध्ये कापूस जिनिंग मिल आहे. दर रविवारी शहरामध्ये आठवडे बाजार असतो. सिल्लोड तालुक्यामध्ये माध्यमिक व उच्च शिक्षणाची सोय आहे तसेच संगणक संस्था, महाविद्यालये आहेत.
मुरडेश्वर हे शिव मंदिर सिल्लोड तालुक्यात प्रसिद्ध आहे. तसेच चिंचवण (वडाचे) येथे दहा एकर व्हून जास्त वडाची झाडे आहेत येथे प्राचीन महादेव मंदिर आहे, चारनेर हे सिल्लोड तालुक्यातील एक गाव आहे. चारनेर येथील दत्त मंदिर खुप प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी दत्त जयंतीनिमित्त भाविक गर्दी करत असतात. चारनेरची लोकसंख्या साधारण ३ ते ४ हजार आहे. चारनेर हे चारणा नदीच्या काठी वसलेले आहे. येथे हिंदू मुस्लिम गुण्यागोविंदाने राहतात. येथे चारनेर मध्यम प्रकल्प आहे त्यावर १० ते १५ गावचा प्रश्न मिटतो. चारनेर हे सिल्लोड शहारापासून २७ किलोमीटर अंतरावर आहे.चारनेर हे राज्य महामार्ग ४० वर आहे.
नागझरी हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र सिल्लोड तालुक्यातील पालोद गावात आहे येथे महादेव मंदिर व पवित्र गोमुख तीर्थ आहे त्याला पावसाळा व हिवाळ्यात पाणी चालू राहते. पालोद येथील खेळणा मध्यम प्रकल्प सिल्लोड सह ०८ते १० गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवतो.