Jump to content

सिलचर

सिलचर
শিলচর
आसाममधील शहर

बराक नदीवर वसलेले सिलचर
सिलचर is located in आसाम
सिलचर
सिलचर
सिलचरचे आसाममधील स्थान

गुणक: 24°49′48″N 92°46′48″E / 24.83000°N 92.78000°E / 24.83000; 92.78000

देशभारत ध्वज भारत
राज्य आसाम
जिल्हा कचर जिल्हा
समुद्रसपाटीपासुन उंची ७२ फूट (२२ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १,७२,८३०
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


सिलचर (आसामी: শিলচর) हे भारत देशाच्या आसाम राज्यातील कचर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. सिलचर शहर आसामच्या दक्षिण भागात गुवाहाटीच्या ३४० किमी आग्नेयेस बराक नदीच्या काठावर वसले असून ते गुवाहाटीखलोखाल राज्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर आहे. २०११ साली येथील लोकसंख्या १.७२ लाख इतकी होती.

सिलचर आसामचे शैक्षणिक केंद्र मानले जाते. आसाम विद्यापीठ व राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, सिलचर ह्या येथील दोन प्रमुख उच्च शिक्षणसंस्था आहेत. सिलचर (लोकसभा मतदारसंघ) हा सिलचरमधील लोकसभा मतदारसंघ आहे.

भारताच्या स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतर अखेर सिलचर शहर भारतीय रेल्वेच्या ब्रॉडगेज रेल्वेमार्गावर आणण्यात आले. सिलचर रेल्वे स्थानक उत्तर पूर्व सीमा रेल्वेच्या लुमडिंग विभागाच्या अखत्यारीत येते. कांचनगंगा एक्सप्रेस सिलचरला कोलकाता शहरासोबत तर पूर्वोत्तर संपर्क क्रांती एक्सप्रेस सिलचरला नवी दिल्लीसोबत जोडते. सिलचर विमानतळ सिलचर शहरापासून २६ किमी अंतरावर स्थित असून येथून इम्फाळ, गुवाहाटीकोलकाता ह्या शहरांसाठी थेट विमान प्रवासीसेवा उपलब्ध आहे.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत