सिमोन बॉलिव्हार
सिमोन बॉलिव्हार | |
व्हेनेझुएलाचे दुसरे राष्ट्रपती | |
---|---|
कार्यकाळ ६ ऑगस्ट १८१३ – ७ जुलै १८१४ | |
मागील | ख्रीस्टोबाल मेंडोझा |
व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती | |
कार्यकाळ १५ फेब्रुवारी १८१९ – १७ डिसेंबर १८१९ | |
पुढील | जोझ अँटोनियो पेझ |
कार्यकाळ १७ डिसेंबर १८१९ – ४ मे १८३२ | |
पुढील | दॉमिंगो कायकेडो |
बोलिव्हियाचे पहिले राष्ट्रपती | |
कार्यकाळ १२ ऑगस्ट १८२५ – २९ डिसेंबर १८२५ | |
पुढील | अँटोनियो जोझ दे सुक्रे |
पेरूचे राष्ट्रपती | |
कार्यकाळ १७ फेब्रुवारी १८२४ – २८ जानेवारी १८२७ | |
मागील | जोझ बर्नार्डो दे टॅग्ले, मारक्वीस ऑफ टोर्रे-टॅग्ले |
पुढील | आंद्रेस दे सांता क्रुझ |
जन्म | २४ जुलै १७८३ काराकास ,कॅप्टन्सी जनरल ऑफ व्हेनेझुएला, स्पॅनिश साम्राज्य |
मृत्यू | १७ डिसेंबर १८३० सांता मार्ता, न्यु ग्रॅनाडा |
पत्नी | मारीया तेरेसा रॉद्रिगेझ देल तोरो इ अलायसा |
धर्म | रोमन कॅथलिक |
सही |
सिमोन होजे अंतोनियो दिला सान्तिसिमा त्रिनिदाद बॉलिव्हार इ पॅलासियोस (जुलै २४, इ.स. १७८३-डिसेंबर १७, इ.स. १८३०) हा दक्षिण अमेरिकेतील एक क्रांतिकारी नेता होता.
त्याने व्हेनेझुएला, कोलंबिया, इक्वेडोर, पेरू, पनामा, आणि बॉलिव्हिया या देशांना स्पेनपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोठी कामगिरी निभावली. या सगळ्या देशांमध्ये तो एक आदरणीय व्यक्तिमत्त्व आहे. त्याला तेथे एल लिबर्तादोर (मुक्तिदाता) म्हणून संबोधण्यात येते.
इ.स. १८०२ मध्ये त्याने मारिया तेरेसा रोद्रिगेझ देल तोरो इ अलाय्साशी लग्न केले. दुर्दैवाने त्यानंतर एकाच वर्षात तिचा मृत्यू झाला. सिमोन बॉलिव्हारने परत लग्न केले नाही.
दहा वर्षे ग्रान कोलंबिया (बृहत् कोलंबिया)च्या अध्यक्षपदाचा भार वाहिल्यावर डिसेंबर १७, १८३० रोजी त्याने क्षयरोगाशी झगडताना देह ठेवला.
लहानपणीचे आयुष्य
काही जणांचे असे मत आहे की सिमोन बॉलिव्हार याचा जन्म सान माटेओ येथे झाला. पण असे मानले जाते की सिमोन बॉलिव्हारचा जन्म काराकास ,कॅप्टन्सी जनरल ऑफ व्हेनेझुएला, स्पॅनिश साम्राज्य येथे २४ जुलै १७८३ रोजी झाला. जन्मानंतर त्याचे नाव सिमोन जोझ अँटोनियो देला सांतिसिमा त्रिनिदाद बोलिव्हार इ पालकियोस असे ठेवण्यात आले. त्याच्या आईचे नाव डोना मारीया देला कोन्सेपकियोन पालकियोस इ ब्लँको व वडिलांचे नाव कोरोनेल डॉन जुआन विसेंटे बोलिव्हार इ पाँटे होते. सिमोनला दोन मोठ्या बहिणी व एक भाउ होता: मारिया अँटोनिया, जुआना व जुआन विसेंटे. अजुन एक बहिण जन्मतः ख्रिस्तवासी झाली.