Jump to content

सिमोन दि बोव्हा

सिमोन दि बोव्हा
जन्म ९ जानेवारी १९०८ (1908-01-09)
पॅरिस, फ्रान्स
मृत्यू १४ एप्रिल, १९८६
पॅरिस
राष्ट्रीयत्व फ्रेंच
ख्याती तत्त्ववेत्ती, लेखिका, कादंबरीकार


सिमोन ल्युसी एर्नेस्तीन मरी बेर्त्रां दि बोव्हा (फ्रेंच: Simone Lucie Ernestine Marie Bertrand de Beauvoir; ९ जानेवारी १९०८ - १४ एप्रिल १९८६) ही एक फ्रेंच लेखिका, विचारवंत व अस्तित्ववादी तत्त्वज्ञ होती. ह्याचसोबत ती महिला हक्क व सामाजिक तत्त्वांची पुरस्कर्ती होती. तिने महिलावादावर लिहिलेली १९४९ सालची कादंबरी द सेकंड सेक्स जगप्रसिद्ध झाली होती. तिने तत्त्वज्ञानावर अनेक कथा, निबंध व लेख लिहिले. 'पुरुषप्रधान जगात पुरुषी मूल्यांच्या चौकटीत स्त्रीला राहावे लागते, तिला स्वतःच्या मूल्यांची निर्मिती करता येत नाही. त्यामुळे आपल्या अस्तित्वाला अर्थ देणे स्त्रीला अवघड जाते', असे बोव्हा हिचे मत होते. या तिच्या मतामुळे स्त्रीवादी इतिहासलेखनाला बळकटी आली; तसेच इतिहासलेखनात स्त्रियांच्या लेखनाचा अंतर्भाव केला गेला.

ज्याँ-पॉल सार्त्र ह्या प्रसिद्ध फ्रेंच तत्त्वज्ञासोबत दि बोव्हाचे जवळीकीचे संबंध होते परंतु त्यांनी विवाह केला नाही.

बाह्य दुवे